प्रवास महागणार ! एसटीच्या भाड्यात वाढ होण्याची शक्यता…

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे काही काल बंद ठेवावी लागलेली सेवा, रोडावलेली प्रवासी संख्या, डिझेलचे वाढलेले भाव यामुळे कोट्यवधींचे नुकसान सोसावे लागल्याने आधीच अडचणीत असलेल्या एसटी महामंडळाचा पाय आणखीनच खोलात गेला आहे. यामुळे प्रवासी भाड्यात वाढ करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला असल्याचे वृत्त आहे. यामुळे प्रवाशांना जादा भुर्दंड सोसावा लागणार आहे.   सध्या एसटी महामंडळाच्या १५… Continue reading प्रवास महागणार ! एसटीच्या भाड्यात वाढ होण्याची शक्यता…

जय देव जय देव जय विजय वडेट्टीवार देवा…

चंद्रपूर (वृत्तसंस्था) : भाजप-शिवसेना सरकारने २०१५ साली चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केली होती. या निर्णयाचा जिल्ह्यातील दारू विक्रेते आणि बार व्यावसायिक यांना चांगलाच फटका बसला होता. काही दिवसांपूर्वी मदत व पुनर्वसन मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेतला. यामुळे दारू विक्रेते सुखावले. जिल्ह्यात मागील चार दिवसांत कोट्यवधींची मद्यविक्री झाली. एका बारमालकाने याचा आनंद साजरा… Continue reading जय देव जय देव जय विजय वडेट्टीवार देवा…

एकनाथ खडसे यांना झटका : इडीने बजावले समन्स

मुंबई (प्रतिनिधी) : सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना यांना झटका दिला आहे. भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केल्यानंतर खडसे यांना ईडीने समन्स बजावले आहे.  खडसे यांना उद्या (गुरुवार) सकाळी ११ वाजता हजर राहण्यास सांगितले आहे. यावरूनच भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ‘आता खडसे यांनी सीडी लावूनच दाखवावी’, असा चिमटा… Continue reading एकनाथ खडसे यांना झटका : इडीने बजावले समन्स

काँग्रेसला धक्का : माजी गृहराज्यमंत्री भाजपमध्ये प्रवेश करणार !

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात काँग्रेसमध्ये सर्वकाही आलबेल नाही, हे सर्वश्रुत आहे. भाजपने काँग्रेसचा आणखी एक नेता गळाला लावला आहे. राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आणि सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या खास मर्जीतले मानले जाणारे वरिष्ठ नेते कृपाशंकर सिंह यांनी पक्षाचा ‘हात’ सोडला आहे. ते उद्या (बुधवार) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबई काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात… Continue reading काँग्रेसला धक्का : माजी गृहराज्यमंत्री भाजपमध्ये प्रवेश करणार !

शेलार, महाजन, भातखळकरांसह भाजपच्या १२ आमदारांचे १ वर्षासाठी निलंबन

मुंबई (प्रतिनिधी) : विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाची सुरुवात वादळी ठरली आहे. आज (सोमवार) अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपच्या आमदारांनी जोरदार गोंधळ घालत सभागृहाचे कामकाज बंद पाडले. त्यामुळे भाजपच्या आशिष शेलार, अतुल भातखळकर, गिरीश महाजन यांचेसह १२ आमदारांना १ वर्षासाठी निलंबित करण्यात आले असून सभागृहात ठराव मंजूर करण्यात आला आहे. सभागृहाचे कामकाज सुरू… Continue reading शेलार, महाजन, भातखळकरांसह भाजपच्या १२ आमदारांचे १ वर्षासाठी निलंबन

संजय राऊत यांच्यासोबतच्या भेटीबाबत आशिष शेलार म्हणतात…

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेचे नेते, खा. संजय राऊत आणि भाजपचे नेते, आ. आशिष शेलार यांची भेट झाल्याची बातमी एका मराठी वृत्तवाहिनीने दिल्यानंतर या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली. मात्र, अशी भेट झालीच नसल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले आहे. महाविकास आघाडी सरकारमधील वादाच्या बातम्या आणि राज्यातील सत्तांतराच्या चर्चेमुळे या वृत्ताकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले… Continue reading संजय राऊत यांच्यासोबतच्या भेटीबाबत आशिष शेलार म्हणतात…

कीर्तनकार बंडातात्या कराडकर स्थानबद्ध : वारकऱ्यांमध्ये संताप

पुणे (प्रतिनिधी) : वारकरी सांप्रदायातील अग्रणी कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना आज (शनिवार) पिंपरी-चिंचवड पोलिसांनी स्थानबद्ध (नजरकैद) केले आहे. पोलिसांसोबत बंडातात्या आता गाडीमधून पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. पोलिसांच्या या कारवाईने वारकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. पालखी सोहळ्यात वारकरी आळंदी-पंढरपूर चालत जाणारच, असा इशारा बंडातात्या कराडकर यांनी दिला होता. याआधी संत तुकाराम महाराज यांच्या बीज सोहळ्यासाठी… Continue reading कीर्तनकार बंडातात्या कराडकर स्थानबद्ध : वारकऱ्यांमध्ये संताप

‘बारावी’ निकालाचा पॅटर्न ठरला..!

मुंबई (प्रतिनिधी) : बारावीची परीक्षेच्या निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आज (शुक्रवार) शिक्षण मंडळाने २०२०-२१ साठी बारावीच्या निकालाच्या संदर्भातील मूल्यमापन पद्धत जाहीर केली आहे. इयत्ता दहावीमधील बोर्डाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवलेल्या तीन विषयांचे सरासरी गुण यावर आधारित ३० टक्के गुण ग्राह्य धरले जातील. तर दुसरीकडे अकरावी परीक्षेच्या वार्षिक मूल्यमापन आतील विषयनिहाय गुण… Continue reading ‘बारावी’ निकालाचा पॅटर्न ठरला..!

गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा : सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात कोरोनाची दुसरी लाट जरी ओसरत असली तरी तिसरी लाट येण्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्यभरात शिथिल करण्यात आलेले निर्बंध पुन्हा कडक करण्यात आले आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज (मंगळवार) राज्य सरकारने नियमावली प्रसिद्ध करून  ‘यंदाही गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा’ असं आवाहन केले आहे. मागील वर्षाप्रमाणे सार्वजनिक गणेशमूर्ती ४ फूट आणि घरगुती… Continue reading गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा : सरकारकडून नियमावली जाहीर

हुतात्मा तुकाराम ओंबळे यांना संशोधकांकडून अनोखी मानवंदना…

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी भीषण दहशतवादी हल्ल्यात कसाब याला जिवंत पकडताना हुतात्मा झालेले सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम ओंबळे यांचा अशोक चक्र पदकाने सन्मान करण्यात आला होता. आता त्यांना आणखी नव्या पद्धतीने मानवंदना देण्यात आली आहे. महाराष्ट्रात संशोधकांना सापडलेल्या नव्या कोळी प्रजातीला ‘आयसीयस तुकारामी’ असे नाव दिले गेले आहे. संशोधक ध्रुव प्रजापती… Continue reading हुतात्मा तुकाराम ओंबळे यांना संशोधकांकडून अनोखी मानवंदना…

error: Content is protected !!