Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the happy-elementor-addons domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/l5hyiot1whqn/public_html/livemarathi.in/wp-includes/functions.php on line 6121
मुंबई Archives -

साऊथ च्या रूथ प्रभूचा रुतबा !

मुंबई : मार्च महिन्यातील भारतातील 10 सर्वात लोकप्रिय महिला स्टार्सची यादी जाहीर झाली आहे. या यादीत, दक्षिणेकडील अभिनेत्रींनी बॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकलं आहे. भारतातील सर्वात लोकप्रिय महिला ऑरमॅक्स मीडियानं मार्च महिन्यासाठी भारतातील 10 सर्वात लोकप्रिय महिला स्टार्सची यादी जाहीर केली आहे. भारतातील 10 सर्वात लोकप्रिय महिला स्टार्सच्या ताज्या यादीत समंथा प्रभूअव्वल स्थानावर आहेत.यामध्ये बॉलीवूड मधील… Continue reading साऊथ च्या रूथ प्रभूचा रुतबा !

जपानची शिंकन्सेन ट्रेन आता भारतात धावणार!

मुंबई : जपानची बुलेट ट्रेन म्हणून ओळखली जाणारी प्रसिद्ध शिंकन्सेन ट्रेनचे दोन संच जपानने भारताला देण्याची घोषणा केली आहे. भारताच्या पहिल्या हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी ही एक महत्त्वपूर्ण घोषणा आहे. पर्यावरणीय डेटा संकलित करण्यासाठी वापर. हे ट्रेन संच मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे कॉरिडोरच्या चाचणीसाठी वापरले जातील. जपान टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार या ट्रेन संचांचा उपयोग ट्रॅक आणि… Continue reading जपानची शिंकन्सेन ट्रेन आता भारतात धावणार!

के.एल.राहुल – आथियाच्या लेकीची पहिली झलक पाहिली का..?

मुंबई : अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारताचा स्टार क्रिकेटपटू के.एल.राहुल यांनी २३ जानेवारी २०२३ रोजी लग्नगाठ बांधली. काही दिवासांपुर्वीच त्यांनी आपल्या चाहत्यांसोबत काही दिवसांपूर्वीच गोड बातमी शेअर केली होती. २४ मार्चच्या दिवशी राहुल आणि आथिया आई- बाबा झाले. या लोकप्रिय कपलने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एक खास पोस्ट शेअर करत कन्यारत्न प्राप्ती झाल्याची माहिती दिली होती. आता… Continue reading के.एल.राहुल – आथियाच्या लेकीची पहिली झलक पाहिली का..?

कर्करोग जनजागृती तपासणी मोहीम परिणामकारपणे राबवा

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या “कर्करोग जनजागृती व तपासणी मोहीम २०२५” आणि “कर्करोग निदान वाहन” अंतर्गत तपासणीबाबतचा आढावा काल आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी कर्करोग जनजागृती तपासणी मोहीम परिणामकारपणे राबवा, अधिकाऱ्यांना फिल्ड वर जाऊन अशा सेंटर्सला भेटी द्याव्यात आणि… Continue reading कर्करोग जनजागृती तपासणी मोहीम परिणामकारपणे राबवा

सिनेमांचा महामहोत्सव ! तब्बल 41 मराठी सिनेमे मोफत बघण्याची संधी

मुंबई : मुंबईच्या पु.ल.देशपांडे महाराष्ट्र अकादमी येथे येत्या 21 ते 24 एप्रिल 2025 रोजी आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘मराठी चित्रपट महोत्सव – 2025’ साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवात दाखवण्यात येणाऱ्या 41 चित्रपटांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी मंत्रालयात केली. 41 मराठी चित्रपट मोफत या महामहोत्सवामध्ये विविध प्रकारचे, वेगवेगळ्या जॉनरचे 41 मराठी चित्रपट दाखविले जाणार… Continue reading सिनेमांचा महामहोत्सव ! तब्बल 41 मराठी सिनेमे मोफत बघण्याची संधी

अब की बार 40 अंश पार

मुंबई : राज्यात काही ठिकाणी उन्हाचा पारा 40 अंशावर गेला आहे. त्यामुळे राज्यातील फळे, भाजीपाला, नव्याने लागवड केलेल्या रोपांची होरपळ होत आहे. काकडी, केळी, पपई, द्राक्षे, कलिंगड यांसारखी पिके करपून जात आहेत. उन्हाळी पाऊस कमी पडल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. फळभाज्या कारपल्या उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार या भागातील पपई ची झाडे, फळे करपली… Continue reading अब की बार 40 अंश पार

विद्यार्थ्याना पहिलीपासूनच हिंदी भाषा सक्तीची

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये पहिलीपासूनच हिंदी भाषा शिकण्यास अनिवार्य केलेले आहे. ‘राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४’नुसार, मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून शिकावी लागणार आहे. नवीन शैक्षणिक धोरण अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा, मराठी आणि इंग्रजी अशा तीन भाषा असणार आहेत. येत्या… Continue reading विद्यार्थ्याना पहिलीपासूनच हिंदी भाषा सक्तीची

‘करण अर्जुन 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ?

मुंबई : बॉलीवूड मधील दिग्दर्शक राकेश रोशन यांनी बनवलेला आणि सुपरहिट बनलेला करण अर्जुन हा सिनेमा अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. यातील करण अर्जुन यांची जोडी म्हणजेच सुपरस्टार शाहरुख खान आणि सलमान खान यांची भूमिका दर्शकांना प्रचंड आवडली होती. नवीन करण अर्जुन ची जोडी ‘करण अर्जुन 2’ पुन्हा एकदा दर्शकांना पाहायला मिळणार आहे. एका… Continue reading ‘करण अर्जुन 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ?

वानखेडे स्टेडियमच्या स्टँडला हिटमॅन चे नाव

मुंबई : हिटमॅन म्हणून ओळख असलेला भारताचा कर्णधार रोहीत शर्माचे नाव मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरील स्टँडला दिलं जाणार आहे. रोहित शर्मासोबत शरद पवार आणि अजित वाडेकर यांचं नाव देखील देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रोहित शर्मा चे नाव प्रामुख्यानं भारताच्या यशस्वी कर्णधारांच्या यादीत घेतलं जातं. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतीय क्रिकेट संघानं टी 20 वर्ल्ड कप आणि… Continue reading वानखेडे स्टेडियमच्या स्टँडला हिटमॅन चे नाव

धावत्या ट्रेन मध्ये ATM ची सुविधा

मुंबई : ATM मधून पैसे काढण्यासाठी आता मध्य रेल्वे ने धावत्या ट्रेन मध्ये प्रवाशांना ATM ची सोय केली आहे. प्रवासादरम्यानही प्रवाशांना रोख रक्कम काढण्याची मुंबई ते मनमाड दरम्यान धावणाऱ्या मध्य रेल्वेच्या पंचवटी एक्स्प्रेसमध्ये एटीएमची सुविधा उपलब्ध झाली आहे. अशा प्रकारची सुविधा असलेली ही पहिलीच एक्सप्रेस आहे. याचा फायदा प्रवाशांसोबतच रेल्वे महसूल ला देखील होणार आहे.… Continue reading धावत्या ट्रेन मध्ये ATM ची सुविधा

error: Content is protected !!