बहिरेश्वर गावच्या सरपंचावरील अविश्वास ठराव मंजूर

सावरवाडी (प्रतिनिधी) : सरपंचाचा मनमानी कारभार आणि ठरलेल्या वेळी सरपंचानी राजीनामा न दिल्याने बहिरेश्वर (ता. करवीर) गावच्या  सरपंच साऊबाई बचाटे यांच्यावरील अविश्वासदर्शक ठराव १० मतांनी मंजूर  करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या सभागृहात सदस्यांच्या व्यापक बैठकीत या  अविश्वास ठरावावर मतदान झाले. करवीरच्या तहशिलदार शितल भांबरे-मुळे यांच्या अध्यक्षतेखाली हा अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. गावच्या ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता… Continue reading बहिरेश्वर गावच्या सरपंचावरील अविश्वास ठराव मंजूर

पंचगंगा, सावित्रीबाई फुले रुग्णालयात औषधांची उपलब्धी करा : शोभा कवाळे

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  महापालिकेच्या पंचगंगा आणि सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये बाळंतपणासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी पुरेशी औषधांची आणि अनुषांगिक साहित्याची उपलब्धी करुन ठेवण्याचे आदेश महिला बालकल्याण समिती सभापती शोभा कवाळे यांनी आज दिले. त्या आज (मंगळवार) महिला व बालकल्याण समितीच्या सभेवेळी बोलत होत्या.   शोभा कवाळे म्हणाल्या की, महापालिकेची पंचगंगा आणि सावित्रीबाई फुले हॉस्पिटल ही शहर आणि जिल्हयातील जनतेची… Continue reading पंचगंगा, सावित्रीबाई फुले रुग्णालयात औषधांची उपलब्धी करा : शोभा कवाळे

दिव्यांगांना अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिका द्याव्यात

कागल (प्रतिनिधी) : शासनाच्या दि. १७ जुलै २०१९ च्या निर्णयानुसार दिव्यांग नागरिकांना त्यांच्या हक्काचे ३५ किलो धान्य आणि अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिका द्याव्यात. तसेच त्यांची दारिद्र्य रेषेखाली नाव नोंदणी करावी. अन्यथा नाईलाजाने तहसीलदार कार्यालयावर मोर्चा, ठिय्या आंदोलन करावे लागेल, असे निवेदन भाजपच्या दिव्यांग आघाडी आणि छावा दिव्यांग सेलच्या मार्फत कागलच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना देण्यात आले.… Continue reading दिव्यांगांना अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिका द्याव्यात

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत पन्हाळा शहरात मास्क आणि साबण वाटप

पन्हाळा (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत आज (मंगळवार) पन्हाळा  शहारात नगराध्यक्षा रुपाली धडेल यांच्या हस्ते नागरिकांना मास्क आणि साबणाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मुख्याधिकारी खारगे म्हणाले की, राज्य शासनाच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेमुळे कोविड रुग्णांचे वेळेवर निदान आणि वेळेवर उपचार शक्य होणार असून जीव वाचविण्यास मदत होणार आहे. पन्हाळा… Continue reading ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत पन्हाळा शहरात मास्क आणि साबण वाटप

मास्क न लावणाऱ्यांकडून गेल्या आठवडयात ३० लाख ७१ हजारांचा दंड वसूल

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‘नो मास्क नो एन्ट्री’ची मोहिम महापालिका प्रशासनाने गतिमान केली आहे. कोल्हापूर शहरात विना मास्क, सामाजिक अंतर न राखणाऱ्या नागरिकांविरोधात मोहिम कडक केली असून मागील आठवडयात महानगरपालिका आणि पोलिस प्रशासनाच्या पथकाकडून ३० लाख ७१ हजाराचा दंड वसूल केला असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेटटी यांनी दिली. यामध्ये २१ सप्टेंबर… Continue reading मास्क न लावणाऱ्यांकडून गेल्या आठवडयात ३० लाख ७१ हजारांचा दंड वसूल

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोविड केंद्रावरील नेमणूक रद्द करा : एम. एन. पाटील

राधानगरी (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक कोविड सेंटरवर शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नेमणूका केलेल्या आहेत. त्या नेमणूका त्वरित रद्द कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी व माध्यमिक शिक्षणाअधिकारी यांच्याकडे कोल्हापूर जिल्हा शिक्षकेत्तर संघाचे ज्येष्ठ सदस्य एम. एन. पाटील (नरतवडेकर) यांनी केली. निवेदनात पुढे म्हटले आहे की, प्रशासनाने जून आणि ऑगस्ट महिन्यात कोविड सेंटरवरील केलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या… Continue reading शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोविड केंद्रावरील नेमणूक रद्द करा : एम. एन. पाटील

सीपीआर आगीची गंभीर दखल

कोल्हापूर  (प्रतिनिधी) : येथील सीपीआर ट्रॉमा केअर सेंटरला लागलेल्या आगीची गंभीर दखल जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी घेतली. सीपीआरची तातडीने फायर ऑडिट करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. सीपीआरच्या आगीमुळे चार रूग्ण दगावल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे त्या दुर्घटनेची चौकशी करावी, दुर्घटनेस जबाबदार दोषींवर कारवाई करावी, आगीमुळे रूग्णांच्या ऑक्सिजन पुरवठ्याला व्यत्यय येणार नाही, याची खबरदारी घ्यावी,… Continue reading सीपीआर आगीची गंभीर दखल

‘रेमडीसिवीर’सह अन्य सामग्री दोन दिवसात : पालकसचिव राजगोपाल देवरा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेचे जागोजागी लावलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी मास्क नाही तर प्रवेश नाही या अभिनव उपक्रमाची दखल घेतली. जिल्ह्यात जनजागृतीचे प्रभावी काम दिसत आहे. जिल्ह्याने नोंदविलेल्या मागणीनुसार २ दिवसात रेमडीसिवीरसह अन्य आरोग्य सामग्री पुरविली जाईल, अशी ग्वाही पालकसचिव राजगोपाल देवरा यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड १९ उपाययोजना बाबत आढावा बैठक झाली.… Continue reading ‘रेमडीसिवीर’सह अन्य सामग्री दोन दिवसात : पालकसचिव राजगोपाल देवरा

बहिरेश्वर गावच्या उपसरपंचपदी सुर्वणा दिंडे 

सावरवाडी (प्रतिनिधी) : बहिरेश्वर गावच्या ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सुर्वणा सरदार दिंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायत सदस्याच्या आयोजित व्यापक सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच साऊताई बचाटे होत्या. यावेळी जि. प. चे सदस्य सुभाष सातपूते, ग्रामविकास अधिकारी विमल शेटे, सूर्यकांत दिंडे, सहकार नेते रघुनाथ वरूटे, माजी सरपंच मारूती चव्हाण, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष  मारूती दिंडे, पोलीस पाटील दत्तात्रय कुंभार,… Continue reading बहिरेश्वर गावच्या उपसरपंचपदी सुर्वणा दिंडे 

‘या’ विषयांवर चर्चा करण्यासाठी शिवसेनेचे शिष्ठमंडळ घेणार आयुक्तांची भेट

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाचे संकट सर्वत्र असतानाच हॉस्पिटल्सकडून रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. कोरोनापासून संरक्षण करणाऱ्या मास्क, ऑक्सिमीटर आणि थर्मल स्कॅनरच्या अवाजवी किमतीतून सर्वसामान्य नागरिकांना लुबाडले जात आहे. यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे चित्र आहे.  यासह शासकीय योजनांचा लाभ घेऊनही खाजगी रुग्णालयांकडून कोरोना संशयित आणि पॉझिटिव्ह रुग्णांची होणारी आर्थिक लूट, या आणि… Continue reading ‘या’ विषयांवर चर्चा करण्यासाठी शिवसेनेचे शिष्ठमंडळ घेणार आयुक्तांची भेट

error: Content is protected !!