सावरवाडी (प्रतिनिधी) : बहिरेश्वर गावच्या ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सुर्वणा सरदार दिंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायत सदस्याच्या आयोजित व्यापक सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच साऊताई बचाटे होत्या.

यावेळी जि. प. चे सदस्य सुभाष सातपूते, ग्रामविकास अधिकारी विमल शेटे, सूर्यकांत दिंडे, सहकार नेते रघुनाथ वरूटे, माजी सरपंच मारूती चव्हाण, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष  मारूती दिंडे, पोलीस पाटील दत्तात्रय कुंभार, काँग्रेस नेते परशुराम पाटील, नारायण कांबळे, तानाजी दिंडे, ग्रामपंचायत सर्व सदस्य, कर्मचारी वर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.