कोल्हापूर  (प्रतिनिधी) : येथील सीपीआर ट्रॉमा केअर सेंटरला लागलेल्या आगीची गंभीर दखल जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी घेतली. सीपीआरची तातडीने फायर ऑडिट करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

सीपीआरच्या आगीमुळे चार रूग्ण दगावल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे त्या दुर्घटनेची चौकशी करावी, दुर्घटनेस जबाबदार दोषींवर कारवाई करावी, आगीमुळे रूग्णांच्या ऑक्सिजन पुरवठ्याला व्यत्यय येणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी सीपीआर प्रशासनास दिल्या आहेत.