बालिंगा-नागदेववाडी पंपिंग स्टेशनच्या फिल्टरचे लिकेज काढा : सचिन पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : नागदेववाडी पंपिंग स्टेशनच्या फिल्टर बेडचे लिकेज  तातडीने काढा अशी सुचना स्थायी समिती सभापती सचिन पाटील यांनी केली. ते आज (मंगळवार) नागदेववाडी पंपिंग स्टेशन वरुन पुरविल्या  जाणाऱ्या भागामध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने व काही भागात होत नसल्याने  सचिन पाटील यांनी आज अचानक सकाळी बालिंगा-नागदेवाडी पंपिग स्टेशनची पाहणी केली. या पंपीग स्टेशनवरुन शहरात संपूर्ण सी,… Continue reading बालिंगा-नागदेववाडी पंपिंग स्टेशनच्या फिल्टरचे लिकेज काढा : सचिन पाटील

मास्क नाही तर बँकसेवाही नाही : आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ‘नो मास्क-नो एन्ट्री’ हा उपक्रम शहरात प्रभावीपणे राबविण्यात येत असून आता शहरातील  सर्वच बँकांमध्येही ‘मास्क नाही-बँकसेवाही नाही’, हा उपक्रम कठोरपणे   राबवावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रातील सर्व बँकर्सची विशेष बैठक आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यानी आज (मंगळवार) निवडणूक कार्यालयामधून व्हीसीव्दारे घेतली. त्यावेळी ते… Continue reading मास्क नाही तर बँकसेवाही नाही : आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी

मास्क नसेल तर पेट्रोल, डिझेल, गॅस वितरणही नाही : जिल्हाधिकारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गंत मास्क नसेल तर पेट्रोल, डिझेल, गॅस वितरणही करू नये, असा आदेश वितरकांना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला आहे. ते म्हणाले, जिल्हयातील पेट्रोल, डिझेल वितरण पंप, गॅस वितरण केंद्रातर्फे ग्राहकांना सेवा पुरविल्या जातात. या ठिकाणी मोठया प्रमाणात नागरिकांची येणे जाणे सुरू… Continue reading मास्क नसेल तर पेट्रोल, डिझेल, गॅस वितरणही नाही : जिल्हाधिकारी

स्थिती दिलासादायक परंतु धोका टळलेला नाही : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

कागल (प्रतिनिधी) : मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांचा आकडा कमी होत आहे. तसेच बाधितांच्या मृत्यूची संख्याही घटत चालली आहे. बदलणारी ही स्थिती निश्चितच दिलासादायक आहे, परंतु धोका टळलेला नाही, असा दक्षतेचा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. आता जरी परिस्थिती चांगली वाटत असली तरी लवकरच हॉटेल, लोकल आणि रेल्वे सेवा तसेच नवरात्रोत्सवाच्या सणामुळे रुग्ण वाढणार… Continue reading स्थिती दिलासादायक परंतु धोका टळलेला नाही : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

पथविक्रेत्यांनी कर्जासाठी तात्काळ अर्ज करावा : आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सर्व्हेक्षण झालेल्या आणि सर्व्हेक्षणापासून वंचित असलेल्या पथविक्रेत्यांनी पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत कर्जासाठी तात्काळ अर्ज करावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यानी केले. ते पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेच्या अंमलबजावणीचा आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी निवडणूक कार्यालयात आढावा घेतला, त्यावेळी बोलत होते. यावेळी डॉ. कलशेट्टी म्हणाले की, ज्या पथविक्रेत्यांचा सर्व्हे… Continue reading पथविक्रेत्यांनी कर्जासाठी तात्काळ अर्ज करावा : आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी

‘सायबांच्या आशिर्वादानं मटका-जुगार फोफावतोय !’ कळे पोलीस वरिष्ठांचा मनमानी कारभार (भाग ५)

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील कळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांना ऊत आला असून, पोलीस ठाण्याचे सपोनि या प्रकारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. यामुळे नागरिकांमधून याबाबत संताप व्यक्त होत आहे. तरी नवनियुक्त जिल्हा पोलीस प्रमुख शैलैश बलकवडे यांनी या गोष्टींमध्ये लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. कळेसह पोलीस ठाण्याच्या हद्दीत… Continue reading ‘सायबांच्या आशिर्वादानं मटका-जुगार फोफावतोय !’ कळे पोलीस वरिष्ठांचा मनमानी कारभार (भाग ५)

जुलै २०२१ पर्यंत कोरोना लस देण्यात येईल : केंद्रीय आरोग्य मंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोनाने थैमान घातले आहे. यावर प्रतिबंधात्मक लस निर्मितीसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. जुलै २०२१ पर्यंत कोट्यवधी लोकांना कोरोना प्रतिबंध लस दिली जाईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दिली. कोरोनावरील लस निर्मितीसाठी विविध कंपन्या प्रयत्न करीत आहेत. काही कंपन्यांची लस दुसऱ्या, तिसऱ्या टप्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री हर्षवर्धन… Continue reading जुलै २०२१ पर्यंत कोरोना लस देण्यात येईल : केंद्रीय आरोग्य मंत्री

दाट वस्त्या-झोपडपट्यांमध्ये नियोजनबध्द सर्व्हेक्षण करा : आयुक्त 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहरातील दाट वस्त्यां तसेच झोपडपट्यांमध्ये सर्व्हेक्षणाची मोहिम नियोजनबध्दरितीने हाती घ्या. या सर्व्हेक्षणाच्या मोहिमेतून एकही नागरिक चुकता कामा नये, अशी सूचना आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केली. महापालिकेच्यावतीने सुरु असलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या कामाचा आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी व्हेबएक्स व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला.  या व्हिडीओ कॉन्फरन्सला उपायुक्त निखिल मोरे, आरोग्य अधिकारी… Continue reading दाट वस्त्या-झोपडपट्यांमध्ये नियोजनबध्द सर्व्हेक्षण करा : आयुक्त 

कळे परिसरात बोकाळलेल्या ‘खाजगी सावकारी’कडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष (भाग ४)

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील कळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत खाजगी सावकारी करणाऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात आहे. पण वरीष्ठ पोलीस अधिकारी मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यामुळे याबाबत ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. कळेसह पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अनेक गावांत खाजगी सावकारी मोठ्या प्रमाणावर चाललेली असून १० टक्के मासिक दर व्याजाने कर्ज देऊन लोकांची राजरोसपणे लूट… Continue reading कळे परिसरात बोकाळलेल्या ‘खाजगी सावकारी’कडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष (भाग ४)

पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे,गणेश बिराजदार नागपूरचे नवे सहाय्यक पोलीस आयुक्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरच्या पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे आणि इचलकरंजीचे पोलीस उपअधीक्षक उपअधीक्षक गणेश बिराजदार यांची नागपूर शहरच्या सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. राज्य सरकारने काल (बुधवार) रात्री उशिरा पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. कोल्हापूर जिल्ह्यात नव्याने तीन पोलीस उपअधीक्षक यांची नेमणूक झाली आहे. यामध्ये रत्नागिरीचे पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे यांची… Continue reading पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे,गणेश बिराजदार नागपूरचे नवे सहाय्यक पोलीस आयुक्त

error: Content is protected !!