कोल्हापूर (प्रतिनिधी) : नागदेववाडी पंपिंग स्टेशनच्या फिल्टर बेडचे लिकेज  तातडीने काढा अशी सुचना स्थायी समिती सभापती सचिन पाटील यांनी केली. ते आज (मंगळवार) नागदेववाडी पंपिंग स्टेशन वरुन पुरविल्या  जाणाऱ्या भागामध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने व काही भागात होत नसल्याने  सचिन पाटील यांनी आज अचानक सकाळी बालिंगा-नागदेवाडी पंपिग स्टेशनची पाहणी केली.

या पंपीग स्टेशनवरुन शहरात संपूर्ण सी, डी वॉर्ड व ए वॉर्डमधील फुलेवाडी, लक्षतीर्थ फुलेवाडी रिंगरोड परिसर, ई वॉर्डमधील शाहुपूरी आणि बागल चौक परिसर  भागात पाणी पुरवठा होतो. पंरतू गेले आठ दिवस काही भागात कमी दाबाने आणि वेळेपुर्वीच पाणी पुरवठा बंद होत असल्याच्या तक्रारी सभापतींकडे आल्या होत्या. यामुळे स्थायी समिती सभापती सचिन पाटील यांनी माजी नगरसेवक विनायक फाळके यांच्या समवेत बालिंगा  नागदेववाडी पंपिंग स्टेशनची पहाणी केली.

यावेळी बालिंगा-नागदेववाडी पंपिंग स्टेशन येथील परिस्थितीचा आढावा घेऊन पाण्याची लेव्हल होत नसल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी फिल्टरसाठी येणारे पाणी फिल्टर बेडमध्ये सोडले जाते. परंतू या फिल्टर बेडला गेले दीड ते दोन वर्ष लिकेज असलेने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. तसेच मुख्य लाईनमधून पडणाऱ्या पाण्यावर जाळी बसविणेबाबत यापुर्वी सुचना देऊनही अद्याप जाळी बसवली नसलेने त्यांनी नाराजी व्यक्त केली. पाणी पुरवठा संदर्भातील इतर तातडीची कामे करणेसाठी सांगितले असता कोव्हीडचे कारण अभियंता सांगणे चुकीचे असलेबाबत अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांना सांगितलेयाबाबत उद्या पाणी पुरवठा विभागाचा आढावा स्थायी समिती सभागृहात  सभापती घेणार आहेत.