गगनबावडा (प्रतिनिधी) : गगनबावडा तालुक्यातील अणदुर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विलास पाटील फाउंडेशनने तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये ११० दात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.

यामध्ये ग्रामिण पत्रकार संघटनेचे गगनबावड्याचे अध्यक्ष संभाजी सुतार, महादेव कांबळे यांनी रक्तदान केले. तसेच फाउंडेशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. तसेच रक्तदान करण्यासाठी विविध ठिकाणाहून तरुणांनी या शिबिराला हजेरी लावून रक्तदान केले

यावेळी अध्यक्ष विठ्ठल पाटील, उपाध्यक्ष संदीप पाटील, सचिव सुधाकर पाटील, संदिप पाटील, रुपेश सावंत, संकेत पाटील,भीमराव पाटील, रणजीत पाटील, अजित पाटील, उमेश पाटील, शरद पाटील, संदीप पाटील, सुरज पाटील, अनिकेत पाटील, भरत पाटील आदी उपस्थित होते.