दिंडनेर्ली (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील दऱ्याचे वडगांव येथे आज (सोमवार) गणेश जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. समाजकार्यात अग्रेसर असणारे बालवीर तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला.जीवनदारा ब्लड बँकेच्या माध्यमातून गावातील 30 ते 40 रक्तदात्यांनी आज रक्तदान केले.
यावेळी गणराज संकपाळ, माजी सरपंच साताप्पा मगदूम, भानुदास मगदूम, दत्तात्रेय मगदूम, पंढरी मगदूम, शहाजी मगदूम आदी उपस्थित होते.