कपिलेश्वर (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील कपिलेश्वर येथेल ग्रामदैवत श्री कपिलनाथ आणि एकविरा देवी यात्रेनिमित्त आझाद हिंद मंडळ, ग्रामस्थांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. कोल्हापूर येथील संजीवनी ब्लड हॉस्पिटल यांच्या सौजन्याने विठ्ठल मंदिर येथे रक्तदान शिबिर पार पडले. यावेळी अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग घेतला.

तसेच देवीच्या जागरानिमित्त कपिलेश्वर ग्रामस्थांच्यामार्फत मनोरंजनासाठी आज रात्री राधिका पाटील यांचा लावणीचा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे पिराजी पाटील यांनी सांगितले. तसेच कपिलेश्वर ग्रामपंचायत मार्फत यात्रा शांततेत पार पाडण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले आहे.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष अनिल कोरे, डॉ. उमेश कुपटे, अरुण कुराडे, सागर शेळके यांच्या सहभागाने रक्तदान शिबिर पार पडले.