नवी दिल्ली  (वृत्तसंस्था) : भाजपने २०२४ मध्ये होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा या निवडणुकांच्या तयारीसाठी १०० दिवसांचा देशव्यापी दौरा करणार आहेत. यादरम्यान पक्षाचा भर गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये कमकुवत ठरलेल्या राज्यांमध्ये आपली स्थिती मजूबत करण्यावर असेल.

नड्डा भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांवर लक्ष केंद्रीत करणार आहेत. तसेच दौऱ्या दरम्यान नड्डा राज्यांतील भाजप नेत्यांशी बैठक घेऊन त्या जागांवर लक्षं केंद्रीत करणार आहे. जिथे २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाला होता. नड्डा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबतही बैठक घेणार आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (राजग) ची व्याप्ती वाढविणे हाच या दौऱ्यामागील मुख्य हेतू असेल. तसेच संभाव्य सहयोगी मुद्द्यांवरही जेपी नड्डा राज्यांतील नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत.