मुंबई ( वृत्तसंस्था ) शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना-यूबीटी) नेते उद्धव ठाकरे यांनी दावा केला की भारतीय जनता पक्ष (भाजप) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) 400 पेक्षा जास्त जागा जिंकायच्या आहेत जेणेकरून ते संविधान बदलू शकतील. असा गंभीर आरोप केला आहे.

याबाबत पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, भारतीय राज्यघटना त्यांच्यासाठी (भाजप) ओझे आहे. त्यांना वाटते दलिताने लिहिलेली राज्यघटना का पाळावी ? त्यांना 400 पेक्षा जास्त जागा जिंकायच्या आहेत जेणेकरून त्यांना डॉ. बी.आर. आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना बदलता येईल.

केंद्र सरकार शेतीमालाला योग्य भाव न देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. या (भाजप) लोकांनी लुटलेले महाराष्ट्राचे वैभव आम्ही सत्तेवर आल्यावर परत करू, असा आरोप ठाकरे यांनी धुळ्यात महाविकास आघाडीच्या उमेदवार शोभा बच्छाव यांच्या सभेत बोलताना केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत (स्वराज्यासाठी) लुटली होती पण आता सुरतचे हे दोघे (व्यक्ती) छत्रपतींचा महाराष्ट्र लुटत आहेत. असा ही आरोप ठाकरे यांनी केला आहे.