पिंपळगाव (प्रतिनिधी) : कोरोनाकाळात माणसांच्या मानसिकतेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. अनेकजण पुढे येऊन विविध गोष्टींचे दान करत आहेत. अशाच पद्धतीची सामाजिक बांधिलकी जपली आहे दिंडेवाडीच्या उपसरपंच अशोक गुरव यांनी. पिंपळगाव येथील नव्याने सुरुवात झालेली करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी या वाचनालयास त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पुस्तके भेट दिली.
सध्याच्या या डिजिताल युगात वाचनसंस्कृती लोप पावत चालली आहे. तरुणांचा सोशल मिडियाकडेच जास्त काल पाहायला मिळतो. पण वाचनाने माणूस समृध्द होतो, हे महत्त्व हल्लीची पिढी विसरत चालली आहे. अशोक गुरव हे दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील गरजू व्यक्तींना आवश्यक गोष्टींचे दान करत असतात. यावर्षी वाचनाचे महत्त्व नव्याने या पिढीला कळावे, या हेतूने त्यांनी आपल्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून पिंपळगाव येथील वाचनालयाला पुस्तके भेट देण्याचे ठरवले.
या उपक्रमाला वाचनालयाचे संस्थापक धनाजी भाईंगडे, शिवारबाचे प्रकाशक प्रकाश केसरकर, उद्योजक दत्तात्रय सुतार, वक्ते किरण देशपांडे, केंद्रशाळा दिंडेवाडीचे शिक्षक संजय गुरव आणि दयानंद गुरव सर उपस्थित होते.