शिरूर – सध्या राज्यात लोकसभा रणांगण चालू आहे. लोकसभा मतदार संघाचा सर्वाधिक चर्चेचा विषय बनला होता तो शिरूळ लोकसभा मतदान संघ. शिरूळ लोकसभा मतदार संघातून शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे विरुद्ध अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांची लढत होणार का..? या कडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. पण अजित पवार गटाकडून शिवाजी आढळराव यांना उमेदवारी जाहीर झाली आहे पण आता शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या एका वक्त्यव्यानंतर शिरूळ लोकसभा मतदार संघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कोल्हे यांनी छगन भुजबळ यांच्या विषयी एक मोठा खुलासा केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिरुर लोकसभेत माझ्या विरोधात छगन भुजबळांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार होते. मात्र, भुजबळांनी शिरुरमधून लढण्यास नकार दिला. हा खुलासा त्यांनी केला आहे. याबाबत आता छगन भुजबळांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ..?

छगन भुजबळ म्हणाले की, नाशिकमधून माझे नाव फायनल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला फोन करून शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढता का? अशी विचारणा केली होती. शिरूरमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर ओबीसी समाज आहे. मी शिरूरमधून निवडणूक लढवली तर नाशिकची जागा त्यांना मिळाली असती, असा त्यामागे हेतू होता. मात्र मी नाशिक सोडून जायचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागणीला नकार दिला, असे स्पष्टीकरण छगन भुजबळ यांनी दिले आहे.