पुणे (प्रतिनिधी) : “महाविजय २०२४” संकल्प विधानसभा वॉरियर संवाद बैठक आज नारायणगाव येथे पार पडली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत शिरुर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर, आंबेगाव, खेड विधानसभा क्षेत्रासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह चंद्रकांत पाटील हे देखील या प्रवासात सहभागी झाले आहेत.

यावेळी ना. पाटील यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात अनेक लोककल्याणकारी योजना सुरू आहेत. देशातील सर्वसामान्य नागरिकांना यांच्या नेतृत्वाचा अभिमान आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पुन्हा घवघवीत यश मिळून नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतीलच, असा संकल्प यावेळी सर्वांनी करावा, असे आवाहन केले.  

शिरूर लोकसभा अंतर्गत जुन्नर, आंबेगाव आणि खेड विधानसभेत आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत लोकसहभागातून महाविजय साकारण्यासाठी प्रत्येक विधानसभेत मजबूत पदाधिकाऱ्यांची फळी तयार व्हावी. तसेच बूथ सशक्तीकरण अभियान, मतदार नोंदणी, सरल ॲप नोंदणी, सोशल मीडिया, संघटनात्मक बांधणी तसेच विविध विषयांवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संवाद करण्यात आले.  

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहळ, प्रदेश प्रवक्ते  जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील,  भाजप प्रदेशचे महासचिव विक्रांत पाटील, जुन्नर विधानसभा निवडणूक प्रमुख श्रीमती आशाताई बुचडे, शिरूर विधानसभा निवडणूक प्रमुख  प्रदीप कंद, आंबेगाव निवडणूक प्रमुख श्रीमती जयश्री पालांडे, पदाधिकारी, विधानसभा वॉरियर उपस्थित होते.