मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज (शनिवार) ८० वा वाढदिवस आहे. संपूर्ण देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शरद पवारांचे पुतणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमस्थळी पोहोचल्यावर अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

‘शरद पवार साहेब हे खूप मोठे नेते आहेत, मी त्यांच्या कुटुंबातला सदस्य आहे, त्यांचा हा ८० वा वाढदिवस आहे. राज्यात कोविडचे वातावरण आहे, परंतु, सर्व खबरदारी घेऊन जल्लोष साजरा करत आहोत. जवळपास ६० वर्षांपेक्षा जास्त काळ पवार साहेबांना राजकारणात झाले आहे.’ अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. ‘हिमालयाएवढ्या उंचीच्या महाराष्ट्राच्या ‘सह्याद्री’ला, आदरणीय साहेबांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!साहेबांचं नेतृत्वं, मार्गदर्शन आपल्या सर्वांना कायम मिळत रहावं यासाठी त्यांना निरोगी, दीर्घायुष्य लाभावं, अशी प्रार्थना करतो’, असेही ते यावेळी म्हणाले.