सावरवाडी (प्रतिनिधी)  : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी करवीर तालुक्यातील  सावरवाडी गावातील ग्रामदैवत भैरवनाथचा शारदीय नवरात्र उत्सव साधेपणाने साजरा करण्यात येत आहे. शासनाच्या नियमांचे कडक पालन करण्यात येत आहे.

मंदिर बंद असल्यामुळे पाच लोकांनी मंदिरातील नित्य धार्मिक कार्यक्रम  पार पाडण्याचे निर्णय घेण्यात आला. पालखी सोहळे साधेपणाने साजरे करण्यात येणार आहेत. मंदिरात पुजारी,  मानाचे पालखी मानकरी यांनाच फक्त प्रवेश आहे.  त्यामुळे भाविकां  विना मंदिर परिसरात शुकशुकाट जाणवत असून नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येत आहे.