कोल्हापूर (प्रतिनिधी) :  परिवहन विभागाने कोरोनाच्या काळामध्ये ऑटो रिक्षा परवानाधारकांना १,५०० रुपयांचे अनुदान जाहीर केले होते. त्यानुसार आजपर्यंत कार्यालयाकडे ६ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. आजवर कार्यालयाने  ५,४०० इतक्या अर्जांवर कारवाई केली आहे. या परवानाधारकांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. सर्व पात्र परवानाधारकांनी या संधीचा लवकरात लवकर फायदा घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस यांनी केले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र परवानाधारकांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले होते. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सर्व ऑटोरिक्षा संघटना, डीलर्स, ड्रायव्हिंग स्कूल इत्यादींना ऑफलाइन डेमो ट्रेनिंग देण्यात आले. त्याचा फायदा जिल्ह्यातील सर्व संघटना आणि इतर सामाजिक संस्था यांनी घेतला. त्यांनी ऑटो रिक्षा परवानाधारकांना अर्ज करण्यासंबंधी मदत करणारी केंद्रे चालू केली. त्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा झाल्याने परवानाधांद्वारे समाधान व्यक्त केले जात आहे.