कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील राजेंद्रनगर झोपडपट्टीतील ६९ नागरिकांची मोबाईल व्हॅनद्वारे रॅपिड ॲन्टीजन टेस्ट आज (शुक्रवार) करण्यात आली. यामध्ये  ९ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले. तर ६० जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रसार वेगाने वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाच्या वतीने कोरोनाला अटकाव घालण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहे. मात्र, शहरात अजूनही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी, भाजी मार्केटमध्ये महापालिकेच्या वतीने मोबाईल व्हँनद्वारे नागरिकांची रॅपिड ॲन्टीजन टेस्ट करण्यात येत आहे.