क्षारपड जमिनीच्या सुधारणा योजनांसाठी यापुढेही सहकार्य : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर

शिरोळ (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यामध्ये क्षारपड जमिनीचे प्रमाण मोठे आहे. या सर्व जमिनी पिकाखाली आणण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने सुधारणा करणे काळाची गरज आहे. त्यामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी क्षारपड जमीन सुधारणा योजनांचे काम सुरू आहे. अशा योजना राबवणाऱ्यांना यापुढेही सहकार्य राहणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले. हेरवाड येथे राजेंद्र पाटील-यड्रावकर क्षारपड जमिन सुधारणा… Continue reading क्षारपड जमिनीच्या सुधारणा योजनांसाठी यापुढेही सहकार्य : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर

इचलकरंजी नगरपालिकेची हॉटेल सिटीईनवर कारवाई…

इचलकरंजी (प्रतिनिधी) :  कोरोनाच्या काळात राज्य शासनाने हॉटेल व्यावसायिकांना घरपोच पार्सल देण्यासाठी परवानगी दिली आहे.  इचलकरंजी येथील छ. शिवाजी महाराज पुतळा ते डेक्कन रोडवर असणाऱ्या हॉटेल सिटीईन शेजारी कोरोना प्रतिबंधित क्षेत्र असताना देखील खुलेआम पार्सलच्या नावाखाली आतमध्ये बसून लोकांना नाष्टा देत होते. आज (सोमवार) पालिकेच्या जप्ती पथकाने या हॉटेलवर धाड टाकून तेथील सामान जप्त करण्याची… Continue reading इचलकरंजी नगरपालिकेची हॉटेल सिटीईनवर कारवाई…

दिलासादायक : कोरोनाची दुसरी लाट लवकरच ओसरणार…

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोरोनाने मृत होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरही मोठा ताण आला आहे. ऑक्सिजन, रेमडिसीवीर इंजेक्शनची कमतरता भासत आहे. अशी विदारक परिस्थिती असताना आता कोरोनाची दुसरी लाट कधी कमी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना आता राज्याच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ.… Continue reading दिलासादायक : कोरोनाची दुसरी लाट लवकरच ओसरणार…

गडहिंग्लजमध्ये ‘गोकुळ’साठी चक्क ‘व्हेंटिलेटर’वरील मतदाराचे मतदान..?

गडहिंग्लज (प्रकाश चोथे) : गडहिंग्लज तालुक्यातील अत्याळ येथील तानाजीराव मोहिते या ‘गोकुळ’च्या ठरावधारकाचा आज (सोमवार) पहाटे गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालय कोव्हिड सेंटरमध्ये मृत्यू झाला. काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर राहून मृत्यूशी झुंज देत होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली, पण कालच चुरशीने झालेल्या गोकुळच्या निवडणुकीत ‘कागदोपत्री’ पीपीई किट घालून त्यांनी ‘मतदान’ केल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे त्यांनी… Continue reading गडहिंग्लजमध्ये ‘गोकुळ’साठी चक्क ‘व्हेंटिलेटर’वरील मतदाराचे मतदान..?

आजऱ्यात उद्यापासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…

आजरा (प्रतिनिधी) : आजरा तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या पाहता आजरा शहर ८ दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय नगरपंचायत प्रशासनाने घेतला आहे. मंगळवार ४ मे ते ११ मे पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण शहरात जनता कर्फ्यु असणार आहे. यामध्ये भाजीपाला आणि इतर सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती आणि आस्थापनांना दंड… Continue reading आजऱ्यात उद्यापासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…

शाहूवाडीत ‘गोकुळ’साठी २ मतदारांचे पीपीई किट घालून मतदान

शाहूवाडी (प्रतिनिधी) : कोरोनाबाबतची पूर्ण खबरदारी घेत सत्ताधाऱ्यांनी फेटा, तर विरोधकांनी टोपी घालून शाहूवाडी येथील शाहू हायस्कूल येथे गोकुळ निवडणुकीसाठी १०० टक्के मतदान केले. तर सायंकाळी पीपीई किट घालून २ मतदारांनी मतदान केले. तहसिलदार गुरू बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान प्रक्रिया पार पाडली. जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी मतदान केंद्रास भेट दिली. पोलीस उपअधीक्षक आर.… Continue reading शाहूवाडीत ‘गोकुळ’साठी २ मतदारांचे पीपीई किट घालून मतदान

गोकुळ निवडणूक : मतमोजणीसाठी सर्वांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक (व्हिडिओ)  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ)  निवडणुकीसाठी आज (रविवार) मतदान झाले. मंगळवारी (दि. ४) होणाऱ्या मत मोजणी प्रक्रियेतील सर्वांना कोरोना आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक असणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली आहे.  

शक्ती प्रदर्शनाशिवाय ‘गोकुळ’साठी पन्हाळ्यात मतदान  

पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्याच्या ३५३ ठरावधारकांनी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) पंचवार्षिक निवडणुकीसाठी वाघबीळ येथील फोर्ट इंटरनॅशनल ॲकॅडमी येथे शांततेत मतदान पार पाडले.   गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके, माजी आ. चंद्रदीप नरके, उमेदवार चेतन नरके, अजित नरके, अमरसिंह पाटील यांनी मतदान केले. त्यानंतर सत्तारुढ गटाच्या ठरावधारकांनी एकत्र येत मतदान केले. त्यानंतर विरोधी आघाडीचे… Continue reading शक्ती प्रदर्शनाशिवाय ‘गोकुळ’साठी पन्हाळ्यात मतदान  

गगनबावडा येथे पालकमंत्र्यांनी केले मतदान    

साळवण (प्रतिनधी)  :  गगनबावडा तालुक्यातील माधव विद्यालयात  गोकुळ दूध संघाची निवडणूक मतदान प्रक्रिया  आज (रविवार) शांततेत पार पडली. यावेळी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचे ठरावधारक मतदार यांनी पिवळ्या टोप्या व पिवळे मास्क घालून शक्ती प्रदर्शन करत मतदान केले.  तर पालकमंत्री सतेज पाटील यांनीही मतदानाचा हक्का बजावला.   मतदान प्रक्रिया सकाळी ८ वाजता सुरु झाली. यावेळी काही… Continue reading गगनबावडा येथे पालकमंत्र्यांनी केले मतदान    

व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टच्या मोफत कोविड केंद्राचे लोकार्पण

कोल्हापूर  (प्रतिनिधी) : महापालिका,  जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदच्या सहकार्यातून व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टने सायबर महाविद्यालयातील बॉईज हॉस्टेलमध्ये सुरू केलेल्या मोफत कोविड काळजी केंद्राचे लोकार्पण महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आले.  डॉ. बलकवडे  म्हणाल्या की, गतवर्षी प्रमाणे याही वर्षी रूग्णांच्यावर चांगले उपचार होतील. या केंद्राची ऑक्सिजन,  इलेक्ट्रीकल आणि फायर ऑडीट झाले आहे. डॉक्टर… Continue reading व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टच्या मोफत कोविड केंद्राचे लोकार्पण

error: Content is protected !!