छ. शाहू सहकारी ऊस तोडणी वाहतूक संस्थेची निवडणूक बिनविरोध

कागल (प्रतिनिधी) : येथील श्री छत्रपती शाहू ग्रुप अंतर्गत श्री छत्रपती शाहू सहकारी कृषिपूरक ऊस तोडणी – वाहतूक संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून यु. ए. माने यांनी काम पाहिले. २०२१-२०२६ या सालासाठी ही निवडणूक प्रक्रिया झाली. सहकारातील आदर्श व्यक्तिमत्व स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे संस्थापक असलेल्या या संस्थेची धुरा सध्या शाहू साखर… Continue reading छ. शाहू सहकारी ऊस तोडणी वाहतूक संस्थेची निवडणूक बिनविरोध

विधान परिषदेसाठी जनता दलाचं ‘काय ठरलंय..?

गडहिंग्लज (प्रतीनिधी) : विधानपरिषदेच्या रणधुमाळीत नेत्यांच्या भेटीगाठींना जितका वेग आलाय, त्याहून जास्त महत्वही आलंय. महाविकास आघाडीकडून ना. सतेज पाटील आणि विरोधात महाडिक कुटुंबीय जिल्ह्यातील सर्वच नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. आज (सोमवार) ना. पाटील यांनी गडहिंग्लज येथे जनता दलाचे नेते श्रीपतराव शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमावर श्रीपतराव शिंदे यांनी ना. पाटील यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर… Continue reading विधान परिषदेसाठी जनता दलाचं ‘काय ठरलंय..?

सीपीआरमधील अधिष्ठातांची नियुक्ती ३ वर्षासाठी करण्याची मागणी   

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य गोरगरिबांचा आधारवड ठरलेल्या आणि थोरला दवाखाना म्हणून ओळख असलेल्या सीपीआर रुग्णालयातील अधिष्ठातांची नेमणूक ३ वर्षासाठी करण्यात यावी. आणि शेंडा पार्कमध्ये १ हजार बेडचे सुसज्ज हॉस्पिटल उभारावे, या प्रमुख मागण्यासंह अन्य प्रलंबित मागण्या सीपीआर बचाव कृती समितीच्या वतीने करण्यात आल्या. याबाबतचे निवेदन शिष्टमंडळातर्फे सीपीआर प्रशासनाला देण्यात आले. यावेळी सीपीआर मधील… Continue reading सीपीआरमधील अधिष्ठातांची नियुक्ती ३ वर्षासाठी करण्याची मागणी   

‘सोशल इनोव्हेशन’वर बुधवारी राष्ट्रीय परिषद  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुणे इंटरनॅशनल सेंटर (पीआयसी) तर्फे 9 व्या नॅशनल कॉन्फरन्स ऑन सोशल इनोव्हेशन (एनसीएसआय) चे आयोजन दि. १७ आणि १८ नोव्हेंबररोजी करण्यात येणार आहे. ही वार्षिक राष्ट्रीय परिषद पीआयसीचा मुख्य उपक्रम असून कोविड महामारीमुळे यंदा व्हर्च्युअल पध्दतीने आयोजित करण्यात येणार आहे. देशभरातून १४० अर्जांमधून अंतिम फेरीसाठी आदिवासी, ग्रामीण आणि शहरी श्रेणींमध्ये सामाजिक नवसंकल्पनांसाठी… Continue reading ‘सोशल इनोव्हेशन’वर बुधवारी राष्ट्रीय परिषद  

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पंचत्वात विलीन  

पुणे (प्रतिनिधी) : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे  (वय १००) यांचे आज (सोमवार) पहाटे  वृद्धापकाळाने निधन झाले. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्येत मालवली. सकाळी साडे आठ वाजता त्यांचे पार्थिव त्यांच्या पर्वती येथील निवासस्थानी नेण्यात आले.   त्यानंतर  त्यांची अंत्ययात्रा  काढून  वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात  त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.   दरम्यान, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ,… Continue reading शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पंचत्वात विलीन  

६० वर्षात ‘हा’ मुद्दा समोर आला नव्हता : अजित पवारांचा विरोधकावर गंभीर आरोप

सोलापूर (प्रतिनिधी) : मागील ६० वर्षात एसटी महामंडळ विलीनीकरण करण्याचा  मुद्दा समोर आला नव्हता. मात्र, आता विरोधकांकडून मुद्दामहून हा प्रश्न पुढे आणला जात आहे. विविध मुद्दे काढून राज्याला मुद्दाम अडचणीत आणण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून सुरू आहे, असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. पंढरपुरात कार्तिक यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा झाली.… Continue reading ६० वर्षात ‘हा’ मुद्दा समोर आला नव्हता : अजित पवारांचा विरोधकावर गंभीर आरोप

कोल्हापूर जिल्ह्यात अंमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्यांचे समूळ उच्चाटन करा : शिवसेना

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात अंमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्यांचे समूळ उच्चाटन करा, अन्यथा या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला. याबाबतचे निवेदन शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यात अंमली पदार्थांचा व्यापार आणि वापर… Continue reading कोल्हापूर जिल्ह्यात अंमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्यांचे समूळ उच्चाटन करा : शिवसेना

पंढरपुरात कार्तिकी एकादशीनिमित्त अजित पवारांच्या हस्ते महापूजा

पंढरपूर (प्रतिनिधी) : राज्याची भरभराट होऊन शेतकरी व कष्टकरी यांना यश मिळावे. राज्यात धनधान्य, सुख-शांती व समृद्धी नांदावी. जगावरील कोरोनाचे संकट  दूर होऊ दे. सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहण्याची महाराष्ट्राची परंपरा कायम रहावी,  असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  सावळ्या विठुरायाच्या चरणी घातले. कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पंढरपुरच्या… Continue reading पंढरपुरात कार्तिकी एकादशीनिमित्त अजित पवारांच्या हस्ते महापूजा

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन

पुणे (प्रतिनिधी) :  शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (वय १००) यांचे आज (सोमवार) पहाटे निधन झाले. मागील ३ दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर त्यांची  प्राणज्योत मालवली. बाबासाहेब पुरंदरे यांचे मूळ नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे.  त्यांचा जन्म २९ जुलै १९२२ रोजी पुण्याजवळच्या सासवडमध्ये झाला. भारत इतिहास संशोधक मंडळासोबत त्यांनी इतिहास संशोधक म्हणून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली.  २०१५… Continue reading शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन

पाकिस्तानच्या कारागृहातून २० भारतीय मच्छिमारांची सुटका…

मुंबई (प्रतिनिधी) : पाकिस्तानच्या जलक्षेत्रात बेकायदेशीरपणे मासेमारी केल्याचा आरोपावरुन अटक केलेल्या २० भारतीय मच्छिमारांची पाकिस्तानातून सुटका झाली आहे. चार वर्षांची शिक्षा पूर्ण केल्यानंतर आज (रविवार) पाकिस्तानच्या लांधी जिल्हा कारागृहातून त्यांची सुटका करण्यात आली. या मच्छिमारांना उद्या (सोमवार) वाघा सीमेवर  भारताकडे सोपवले जाणार आहे. हे बहुतांश मच्छिमार हे गुजरातमधील आहेत. यावेळी पाकिस्तानच्या लांधी कारागृहाचे अधीक्षक इर्शाद… Continue reading पाकिस्तानच्या कारागृहातून २० भारतीय मच्छिमारांची सुटका…

error: Content is protected !!