धामोड (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील धामोडपैकी कुरणेवाडी येथे आठ दिवसापूर्वी रात्री एका अज्ञात वाहनाच्या धडकेत रस्त्यालगत असलेला विद्युत वाहक पोल मोडला होता.‌ तरीही या पोलवरून कुरणेवाडी आणि तेली वसाहत येथे विद्युत पुरवठा सुरू होता.

यासंदर्भात ‘लाईव्ह मराठी’ने २० डिसेंबर रोजी हा संबंधित पोल बदलण्या संदर्भात वृत्त प्रसारीत केले होते. या वृत्ताची दखल घेत महावितरण कंपनीने हा अर्धवट तुटलेला पोल बदलला आहे. ‘लाईव्ह मराठी’च्या अचूक वृत्ताचे परिसरातून कौतुक होत आहे.