भाजपतर्फे मोफत नेत्र चिकित्सा, मोफत चेष्मे वितरण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह सुरु आहे. यामध्ये आज (शुक्रवार) घेण्यात आलेल्या मोफत नेत्र चिकित्सा व मोफत चेष्मे वितरण कार्यक्रमास उत्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, प. म. देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते भारत माता प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. या… Continue reading भाजपतर्फे मोफत नेत्र चिकित्सा, मोफत चेष्मे वितरण

झेडपीच्या १५ वित्त आयोगाच्या निधी वितरणाला ब्रेक

कोल्हापूर(प्रतिनिधी): जिल्हा परिषदेमधील पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी वाटपामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकारी यांनी मनमानी केली आहे. त्यामुळे माजी बालकल्याण सभापती वंदना मगदूम यांनी याबाबत न्यायालयात दाद मागितली होती. यावर ब्रेक बसला असल्याचे त्यांनी काल सांगितले. गेल्या सर्वसाधारण सभेमध्ये १५ व्या वित्त आयोगाच्या निधीवरून वादंग झाला होता. सभा ऑनलाईन असल्यामुळे सदस्यांना विश्वासात न घेता निधीचे वाटप… Continue reading झेडपीच्या १५ वित्त आयोगाच्या निधी वितरणाला ब्रेक

कोरोनामुळे ‘इतक्या’ संस्थांच्या निवडणुका प्रलंबित (व्हिडिओ)

कोरोनामुळे सहकारी संस्था, नागरी बँकांच्या पंचवार्षिक निवडणुका प्रलंबित आहेत. त्यामुळे गोकुळ, जिल्हा सहकारी बँकेसह जिल्ह्यातील १२०० ते १३०० सहकारी संस्थांच्या विद्यमान संचालकांनाच पुन्हा मुदत वाढ मिळणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी दिली.  

महापालिका, पोलिसांकडून तीन दिवसात २ लाखांचा दंड वसूल : आयुक्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरवासीयांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे बंधनकारक असून गेल्या तीन दिवसात पोलिस आणि महापालिकेच्या पथकांनी २ लाख ६ हजार ५०० रुपयांचा दंड केला असल्याची माहिती आयुक्त्‍ डॉ.मल्लिनाथ कलशेटटी यांनी दिली. शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासन व्यापक उपाययोजना प्रभावीपणे राबवित आहे. आयुक्त डॉ. कलशेटटी म्हणाले की, कोरोनाचा प्रसार… Continue reading महापालिका, पोलिसांकडून तीन दिवसात २ लाखांचा दंड वसूल : आयुक्त

पीक कर्ज वाटपात कोल्हापूर राज्यात प्रथम

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्याकरिता पीक कर्जाचे वार्षिक उद्धिष्ठ २ हजार ४८० कोटीचे आहे. यापैकी ३१ ऑगस्ट २०२० अखेर १ हजार ८९२ कोटी इतकी उद्दिष्टपूर्ती करून राज्यात कोल्हापूर प्रथम स्थानावर राहिला. याबद्दल जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्हा मध्यवर्ती बँक, सर्व राष्ट्रियकृत, ग्रामीण, खासगी, सहकारी बँकांचे अभिनंदन केले. दिलेल्या उद्दिष्टापेक्षा स्वत:हून दुप्पट उद्दिष्ट घेऊन यापुढे सर्वांनी चांगले… Continue reading पीक कर्ज वाटपात कोल्हापूर राज्यात प्रथम

कोल्हापुरकरांनो सावधान : आता मास्कशिवाय प्रवेश नाही

कोल्हापूर (प्रतिनिधी) : व्यापाऱ्यांनी मास्क घातला नसेल तर ग्राहकांनी वस्तू घेवू नयेत आणि ग्राहकांनी मास्क घातला नसेल तर व्यापाऱ्यांनीही वस्तू देवू नयेत, अशी भूमिका घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई केले. व्यापारी असोशिएशनसोबत व्हीडीओ कॉन्फरंन्सींगद्वारे संवाद साधताना ते बोलत होते.   जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवली… Continue reading कोल्हापुरकरांनो सावधान : आता मास्कशिवाय प्रवेश नाही

जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात ठिकठिकाणी दोन दिवसांपासून तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने खरीप पिकांच्या काढणीला गती आली आहे. सोयाबीन काढणीची धांदल सुरू आहे. यामुळे गावांगावांतील शिवारे पुन्हा एकदा गर्दीने फुलून जात आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी आठ पर्यंतच्या चोवीस तासात हातकणंगले, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, करवीर, कागल, गडहिंग्लज, भुदरगड, आजरा तालुक्यात पाऊस झाला नाही. पण… Continue reading जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी

मुंबई इंडियन्सकडून चाहत्यांना यंदा एक धमाकेदार सरप्राइझ

मुंबई : यंदा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाकडून एक मोठे सरप्राइझ आहे. या संघाकडून असा एक क्रिकेटपटू खेळणार आहे. ज्याने क्रिकेटमध्ये पदार्पण करत चित्रपटातपण केले आहे. त्याने चित्रपटामध्ये पाच बॉलवर पाच षटकार खेचले होते. आता तशी फलंदाजी तो दाखवणार का, अशी चर्चा मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांमध्ये सुरु आहे. वाचा- भाजपाच्या ‘या’ नेत्याचा कोरोनामुळे मृत्यू आयपीएलचा १३ वा… Continue reading मुंबई इंडियन्सकडून चाहत्यांना यंदा एक धमाकेदार सरप्राइझ

महाराष्ट्राला ई-पंचायतराज पुरस्कार

मुंबई : आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाच्या माध्यमातून ई-पंचायत क्षेत्रात महाराष्ट्र राज्याने दरवर्षी भरीव कामगिरी केली असून यावर्षी देखील ही उज्वल परंपरा पुढे सुरू ठेवली आहे. याची पोचपावती म्हणून केंद्र शासनाने ई-पंचायत पुरस्कार – 2020  चा तृतीय पुरस्कार देऊन महाराष्ट्र राज्याचा गौरव केला आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी … Continue reading महाराष्ट्राला ई-पंचायतराज पुरस्कार

सारथीचा कारभार आता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हाती…

मुंबई : मराठा समाजाच्या कल्याणासाठी स्थापन केलेल्या सारथी संस्थेचा कारभार आता बहुजन कल्याण विभागाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडील नियोजन विभागाकडे सोपविण्यात आला आहे. बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार हे संस्थेवर अन्याय करीत असल्याच्या आरोपानंतर ते व्यथित झाले होते. त्यानंतर बैठकीत सारथीचा कारभार नियोजन विभागाकडे देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार आदेश निघाला. दरम्यान १३ टक्के… Continue reading सारथीचा कारभार आता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हाती…

error: Content is protected !!