मुंबई : मराठा समाजाच्या कल्याणासाठी स्थापन केलेल्या सारथी संस्थेचा कारभार आता बहुजन कल्याण विभागाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडील नियोजन विभागाकडे सोपविण्यात आला आहे. बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार हे संस्थेवर अन्याय करीत असल्याच्या आरोपानंतर ते व्यथित झाले होते. त्यानंतर बैठकीत सारथीचा कारभार नियोजन विभागाकडे देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार आदेश निघाला.

दरम्यान १३ टक्के पदे न भरता पोलीस शिपाई भरती करण्यात कुठलीही कायदेशीर अडचण नाही. सरकारला तो अधिकार आहे. मराठा आरक्षणाचा राज्यात कायदा आहे, पण त्याला अंतरिम स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे भरती करता येईल, असे मत राज्याचे माजी महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी व्यक्त केले.