गारगोटी कोव्हिड केंद्राला शिक्षक समितीच्यावतीने ऑक्सिजन निर्मिती मशीन प्रदान

गारगोटी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, भुदरगडच्या वतीने ऑक्सिजन निर्मिती मशीन आणि फळे प्रदान करण्याचा कार्यक्रम गारगोटी कोव्हिड केंद्रात संपन्न झाला. यावेळी जिल्हाध्यक्ष अर्जुन पाटील, सरचिटणीस प्रमोद तौंदकर यांच्या हस्ते ऑक्सिजन निर्मिती जनरेटर पं.स. उपसभापती सुनील निंबाळकर, वैद्यकिय अधिक्षक डॉ. भगवान डवरी, डॉ.सचिन यत्नाळकर यांना प्रदान करण्यात आले. भुदरगड तहसीलदार अमोल कदम म्हणाले,… Continue reading गारगोटी कोव्हिड केंद्राला शिक्षक समितीच्यावतीने ऑक्सिजन निर्मिती मशीन प्रदान

अवैध धंद्यांची पाळेमुळे उखडणार ; नूतन पोलीस अधीक्षकांनी स्वीकारला पदभार (व्हिडिओ)

कोल्हापूर जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून शैलेश बलकवडे यांनी पदभार स्वीकारला.  

कळे परिसरात अवैधरित्या मद्य विक्रीकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष; अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार (भाग ३)

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील कळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या मद्य विक्री राजरोसपणे सुरू आहे. वरीष्ठ पोलीस अधिकारी मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. कळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अनेक गावांमध्ये अवैधरित्या मद्य विक्री करत लोकांचा फायदा घेतला जात आहे. प्रत्येक नगामागे मूळ किमतीपेक्षा २० ते २५ रुपये जास्त घेतले… Continue reading कळे परिसरात अवैधरित्या मद्य विक्रीकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष; अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार (भाग ३)

गारगोटी येथील युवा युथ फौंडेशनचा अभिनव उपक्रम…

गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील गारगोटी येथे युवा युथ फौंडेशने तालुक्यात अनेक समाजउपयोगी उपक्रम राबवले आहेत. फौंडेशनच्या सदस्यांनी एक नाविन्यपुर्ण उपक्रम म्हणून किल्ले भुदरगड आणि किल्ले रांगणा किल्यांची स्वच्छता, किल्ले संवर्धन, किल्यांवर असणाऱ्या अनेक मंदीरे आणि शिवकालीन वस्तूंना नावांची पाटी लावणे, दिशादर्शक तसेच जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे. पहिल्या टप्यात फौंडेशनमार्फत किल्ले भुदरगड येथे कामाला… Continue reading गारगोटी येथील युवा युथ फौंडेशनचा अभिनव उपक्रम…

बहिरेश्वर गावच्या सरपंचावरील अविश्वास ठराव मंजूर

सावरवाडी (प्रतिनिधी) : सरपंचाचा मनमानी कारभार आणि ठरलेल्या वेळी सरपंचानी राजीनामा न दिल्याने बहिरेश्वर (ता. करवीर) गावच्या  सरपंच साऊबाई बचाटे यांच्यावरील अविश्वासदर्शक ठराव १० मतांनी मंजूर  करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या सभागृहात सदस्यांच्या व्यापक बैठकीत या  अविश्वास ठरावावर मतदान झाले. करवीरच्या तहशिलदार शितल भांबरे-मुळे यांच्या अध्यक्षतेखाली हा अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. गावच्या ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता… Continue reading बहिरेश्वर गावच्या सरपंचावरील अविश्वास ठराव मंजूर

नूर-ए-रसूल फौंडेशनचे कार्य कौतुकास्पद : आरोग्य राज्यमंत्री

टोप (प्रतिनिधी) : नूर-ए-रसूल फौंडेशनने कोरोनाच्या काळातही सामाजिक बांधिलकी जपली आहे. रुग्णांशी सलोख्याचे नाते ठेवल्यानेच एका महिन्यात अडीचशेहुन अधिक रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असल्याचे मत आरोग्य राज्यमंत्री नाम. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी व्यक्त केले. ते शिरोली इथल्या मदरसामधील कोव्हिड सेंटरमध्ये बोलत होते. हातकणंगले तालुक्यातील शिरोली पु इथल्या मदरसामध्ये कोल्हापुरातील डॉ. असिफ सौदागर यांनी नूर-ए-रसुल फौंडेशनच्या माध्यमातून कोव्हिड… Continue reading नूर-ए-रसूल फौंडेशनचे कार्य कौतुकास्पद : आरोग्य राज्यमंत्री

पुनाळ गावचावडी मार्फत कोरोना जनजागृतीचे संदेश…                           

कोतोली (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन जिल्हाधिकारी दोलत देसाई, तहसिलदार रमेश शेंडगे यांनी आदेश दिले होते. या आदेशाचे पालन करुन मोटरसायकलवर नो मास्क-नो एन्ट्री, माझे कुटुंब-माझी जबाबदारी यासह कोरोनाबाबतचे विविध संदेशाचे  स्टीकर लावून पुनाळ, माजनाळ, तळेवाडी या गावात उपक्रम राबवला.       या उपक्रमामध्ये कळे मंडल अधिकारी सुरेश ठाकरे,तलाटी सुनील शेडगे,कोतवाल सुरेश… Continue reading पुनाळ गावचावडी मार्फत कोरोना जनजागृतीचे संदेश…                           

तर मजूर ऊस तोडणार नाहीत : आ. सुरेश धस  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ऊस तोडणी गळीत हंगाम तोंडावर आला आहे. पण ऊस तोडणी आणि वाहतुकीचा दर वाढीचा करार झाल्याशिवाय ऊसतोड कामगार ऊस तोडणीसाठी जाणार नाहीत. या देशात मैला साफ करणाऱ्यांसाठी कायदा होऊ शकतो, तर ऊस तोड कामगारांसाठी का नाही ? असा प्रश्न आमदार सुरेश धस यांनी उपस्थित केला आहे.राज्यातील ऊसतोडणी मजूर व वाहतुकदारांनी रोजगार वाढीसाठी… Continue reading तर मजूर ऊस तोडणार नाहीत : आ. सुरेश धस  

स्वयंचलित अग्निशामक यंत्रणा जिल्ह्यातील रुग्णांलयांसाठी बसवा : आरोग्य राज्यमंत्री

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सीपीआरसह जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णांलयांसाठी स्वयंचलित अग्निशामक यंत्रणा बसवण्यासाठी प्रस्ताव तयार करावा, अशी सूचना सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी अधिष्ठातांना दिली. आज (बुधवार) सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांनी सीपीआरमधील ट्रामा केअर सेंटरमधील दुर्घटना घडलेल्या कक्षाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर म्हणाले,  डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी,… Continue reading स्वयंचलित अग्निशामक यंत्रणा जिल्ह्यातील रुग्णांलयांसाठी बसवा : आरोग्य राज्यमंत्री

आरटीपीसीआरचे सुधारित दर निश्चित

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोविड १९ तपासणीसाठी राज्यातील एनएबीएल आणि आयसीएमआर मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतून आरटीपीसीआर तपासणीसाठी शासनाने ७ सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार सुधारित दर निश्चित केले आहेत. निश्चित दर सर्व करासहित निश्चित केले असून, कोणत्याही खाजगी प्रयोगशाळेला या दरापेक्षा अधिक दर आकारता येणार नाही. नवीन दरानुसार संकलन ठिकाणावरुन नमुन्याची निवड करणे, नमुन्याची वाहतूक आणि अहवाल देणे, रिपोर्टींग करण्यासाठी… Continue reading आरटीपीसीआरचे सुधारित दर निश्चित

error: Content is protected !!