गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील गारगोटी येथे युवा युथ फौंडेशने तालुक्यात अनेक समाजउपयोगी उपक्रम राबवले आहेत. फौंडेशनच्या सदस्यांनी एक नाविन्यपुर्ण उपक्रम म्हणून किल्ले भुदरगड आणि किल्ले रांगणा किल्यांची स्वच्छता, किल्ले संवर्धन, किल्यांवर असणाऱ्या अनेक मंदीरे आणि शिवकालीन वस्तूंना नावांची पाटी लावणे, दिशादर्शक तसेच जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे. पहिल्या टप्यात फौंडेशनमार्फत किल्ले भुदरगड येथे कामाला सुरवात केली आहे.
एवढ्या मोठ्या संख्येने गड-किल्ले असलेले महाराष्ट्र राज्य देशात एकमेव असे राज्य आहे. त्या प्रत्येक गडाचा आणि किल्ल्यांचा आपला स्वतंत्र असा एक इतिहास आहे. तसेच प्रत्येकाचे आपले एक भौगोलिक महत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समृद्ध इतिहासाची साक्ष म्हणजेच हे गड-किल्ले. हा इतिहास नुसताच पुस्तकातून नव्हे तर प्रत्यक्षात सुद्धा मुलांनी बघितले पाहिजे. त्याच्या आजूबाजूचे वातावरण अनुभवले पाहिजे आणि स्थापत्त्यकलेचा नमुना, अभ्यासला पाहिजे. याच उद्देशाने युवा युथ फौंडेशनमार्फत काम चालले असल्याचे फौंडेशनच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी विक्रमसिंह आबिटकर, रणजितसिंह आबिटकर, प्रथमेश भाट, कुणाल दिवटे, सुशांत चौगले, प्रथमेश चिले, आदित्य शिंदे, प्रथमेश पाटील, अनिकेत महाजन, योगिराज शिगांवकर, सौरभ खोत शुभम पंडीत, सत्यज यांच्यासह फौंडेशनचे सदस्य उपस्थित होते.