कोतोली (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन जिल्हाधिकारी दोलत देसाई, तहसिलदार रमेश शेंडगे यांनी आदेश दिले होते. या आदेशाचे पालन करुन मोटरसायकलवर नो मास्क-नो एन्ट्री, माझे कुटुंब-माझी जबाबदारी यासह कोरोनाबाबतचे विविध संदेशाचे  स्टीकर लावून पुनाळ, माजनाळ, तळेवाडी या गावात उपक्रम राबवला.  

   

या उपक्रमामध्ये कळे मंडल अधिकारी सुरेश ठाकरे,तलाटी सुनील शेडगे,कोतवाल सुरेश वडर, पोलीस पाटील शामराव पाटील, ग्रा.पं. कर्मचारी सुमीत पाटील, ग्रा.पं. सदस्य सरदार सुतार, कळे पोलीस स्टेशनचे हावलदार नामदेव चौगले, राजू पाटील यांनी सहभाग घेतला. हा उपक्रम व्यापक स्वरुपात राबऊन सर्वसामान्य जनतेपर्यंत कोरोनाला रोखण्याचा  संदेश या स्टीकर मार्फत दिला गेला आहे.