दिव्यांग विद्यार्थ्यांनी केलेल्या वस्तू विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन (व्हिडिओ)

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हापरिषदेच्या दिव्यांग शाळांमधील विद्यार्थ्यांनी दिवाळीनिमित्त बनवलेल्या वस्तूंची जिल्हापरिषदेच्या आवारात आज (सोमवार) पासून ३ दिवस प्रदर्शन आणि विक्री चालू केली आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांच्या हस्ते आज करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या दिव्यांग शाळांमधील विद्यार्थ्यांनी दिवाळीसाठी पणत्या, मेणपणत्या, आकाश कंदील, भेटवस्तू तयार केल्या आहेत. या वस्तुंचे प्रदर्शन व विक्री आजपासून… Continue reading दिव्यांग विद्यार्थ्यांनी केलेल्या वस्तू विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन (व्हिडिओ)

‘कोरोना’बाबत सिध्दाळा गार्डन परिसरात जनजागृती रॅली

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी महापालिकेने सुरु केलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत सिध्दाळा गार्डन (प्रभाग क्र.४६) परिसरात आरोग्य विभागाच्या वतीने आज (सोमवार) जनजागृती रॅली काढण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली या जनजागृती रॅलीस सुरुवात करण्यात आली. पुढे सिध्दाळा गार्डन, कोळेकर तिकटीमार्गे पुन्हा नंगीवली चौकात ही रॅली आली. कोरोना संसर्ग… Continue reading ‘कोरोना’बाबत सिध्दाळा गार्डन परिसरात जनजागृती रॅली

दिवसभरात ६३ हजार ९०० रुपये दंड वसूल : आयुक्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरात कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा भंग केल्याप्रकरणी काल (रविवारी) एका दिवसात महानगरपालिका, केएमटी आणि पोलिस प्रशासनाच्या पथकाकडून ५९२ जणांकडून तब्बल ६३ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला असल्याचे, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सांगितले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात ही मोहिम यापुढे अधिक तीव्र करण्याचे निर्देश पथकांना दिले असल्याचेही त्या म्हणाल्या दिवाळीच्या काळात शहरात… Continue reading दिवसभरात ६३ हजार ९०० रुपये दंड वसूल : आयुक्त

आता गोकुळ दुधाचे पॅकिंग कोकणात

कोल्‍हापूर  (प्रतिनिधी) : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) आता कोकणातील वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथे दूध पॅकिंग चालू केले  आहे. सध्‍या नेमळे, फोंडा या भागातून दररोज अंदाजे २२ हजार लिटर दूध संकलित होत असून, ते नाधवडेतील सिंधुभूमी डेअरी फार्म यांच्‍याकडे पॅकींग केले जाणार आहे. भविष्‍यात या भागातील दूध उत्‍पादकांचे हित डोळयासमोर ठेवून दूध संकलनामध्‍ये वाढ… Continue reading आता गोकुळ दुधाचे पॅकिंग कोकणात

कोल्हापूरकरांनो, मास्क वापरा अन्यथा कारवाईला सामोरे जा… : आयुक्तांचा इशारा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दिवाळी साजरी करतानाच कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही याची खबरदारी घ्या. घरातून बाहेर पडताना सर्वांनीच मास्क वापरणे तसेच सामाजिक अंतराचे पालन करणे बंधनकारक आहे, अन्यथा कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असा इशारा महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी आज (सोमवार) दिला. डॉ. बलकवडे यांनी सांगितले की, कोरोना संसर्ग नियंत्रित ठेवण्यासाठी महापालिकेने प्रतिबंधक उपाययोजना… Continue reading कोल्हापूरकरांनो, मास्क वापरा अन्यथा कारवाईला सामोरे जा… : आयुक्तांचा इशारा

मतदान केंद्रांवर योग्य ती कोरोनासंबंधीची खबरदारी : जिल्हाधिकारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विधान परिषदेतील पदवीधर, शिक्षक मतदार संघासाठी १ डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदान केंद्रांवर कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी सुयोग्य सॅनिटायझेशन, मास्क, थर्मल गन, रूग्णवाहिका व सुयोग्य औषधसाठी याबाबत मानक कार्यप्रणाली तयार करावी, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले. पुणे पदवीधर आणि शिक्षक द्विवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक आज (सोमवार)… Continue reading मतदान केंद्रांवर योग्य ती कोरोनासंबंधीची खबरदारी : जिल्हाधिकारी

शिक्षक समितीचे काम आदर्शवत : हसन मुश्रीफ 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिक्षक समितीने केलेले काम आदर्शवत आहे. मला ऐतिहासिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे भाग्य मिळाले . सर्वांनी कोरोनाचे नियम पाळून कोरोना हद्दपार करूया,  असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री  हसन मुश्रीफ यांनी रुग्णवाहिका प्रदान सोहळ्यात केले. यावेळी शिक्षण सभापती प्रवीण यादव,  अध्यक्ष अर्जुन पाटील,  सरचिटणीस प्रमोद तौदकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग… Continue reading शिक्षक समितीचे काम आदर्शवत : हसन मुश्रीफ 

साताऱ्यातून बिचकुलेंचा अर्ज…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातून विधान परिषद निवडणुकीसाठी जिल्ह्यातून अद्याप एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही. सातारा जिल्ह्यातून पदवीधर मतदार संघासाठी सागर शरद भिसे आणि अभिजीत वामनराव आवाडे- बिचुकले (दोन्ही अपक्ष) अशी दोन नामनिर्देशन पत्रे झाली आहेत, अशी माहिती पुणे विभाग पदवीधर मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली. १… Continue reading साताऱ्यातून बिचकुलेंचा अर्ज…

एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा…

मुंबई (प्रतिनिधी) : मागील काही महिन्यांचे वेतन दिवाळीपूर्वी द्यावे, या मागणीसाठी वेतनासाठी संपावर जाण्याचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिला होता. त्याचप्रमाणे जळगाव, रत्नागिरी जिल्ह्यातील दोन एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर मात्र सरकारला जाग आली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना बोनस आणि दोन महिन्यांचा पगार देण्याची घोषणा केली आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना… Continue reading एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा…

…तर महापालिका प्रशासनाला गंभीर परिणाम भोगावे लागतील: ‘आप’चा इशारा (व्हिडिओ)

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर महापालिकेच्या गेल्या पाच वर्षातील कामासह घरफाळा घोटाळा,  खड्डेमय रस्ते, रखडलेली थेट पाईपलाईन योजना, बंद पडत चाललेल्या शाळा,  बेशिस्त दवाखाने,  ढपलेबाज कारभार,  गलिच्छ मूताऱ्या यासह विभागवार कामांचे ऑडीट व्हावे,  या प्रमुख मागण्यांसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने महापालिकेवर आज (सोमवार) पंचनामा मोर्चा काढण्यात आला.  याप्रसंगी  येत्या पंधरा दिवसांत प्रामाणिक ऑडिटर न नेमल्यास त्याचे… Continue reading …तर महापालिका प्रशासनाला गंभीर परिणाम भोगावे लागतील: ‘आप’चा इशारा (व्हिडिओ)

error: Content is protected !!