दाजीपूर पर्यटन विकासासाठी २५ कोटींची तरतूद : मुख्यमंत्र्यांची घोषणा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जैवविविधतेने नटलेला परिसर म्हणून युनेस्कोच्या वारसा स्थळांमध्ये नोंद असलेल्या राधानगरी-दाजीपूर वन्यजीव अभयारण्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याकरिता भरीव निधीची तरतूद करण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने आज (शुक्रवार) वर्षा निवासस्थानी बैठक संपन्न झाली. या बैठकीत ११० कोटी रुपयांच्या पर्यटन विकास आराखड्यास तत्त्वतः मंजुरी देऊन पहिल्या टप्प्यातील… Continue reading दाजीपूर पर्यटन विकासासाठी २५ कोटींची तरतूद : मुख्यमंत्र्यांची घोषणा

‘त्यांनी’ साधा आभाराचा फोनही केला नाही..! : संजय पवार (व्हिडिओ)  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी शिवसेना कार्यकर्त्यांनीही परिश्रम घेतले. शिक्षक मतदारसंघातून प्रा. जयंत आसगावकर हे आमदार झाले, याचा मला आनंद आहे. परंतु त्यांनी आम्हाला आभाराचा साधा एक फोनही केला नाही, अशा स्पष्ट शब्दांत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी नाराजी व्यक्त केली. महाविकास आघाडीच्या वतीने आज (शुक्रवार)… Continue reading ‘त्यांनी’ साधा आभाराचा फोनही केला नाही..! : संजय पवार (व्हिडिओ)  

निकालातील त्रुटी दूर करून विद्यार्थांना न्याय द्या : युवा सेनेची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छ. शिवाजी महाराज विद्यापीठ अंतर्गत ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीने घेण्यात आलेल्या अनेक परिक्षांमधील निकालात अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. त्या दूर करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना शिष्टमंडळाने कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या… Continue reading निकालातील त्रुटी दूर करून विद्यार्थांना न्याय द्या : युवा सेनेची मागणी

कोल्हापूर कोरोना अपडेट : रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (शुक्रवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात १३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिवसभरात ४१ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १,२८९ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या चोवीस… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट

तिन्ही पक्षांनी महापालिका निवडणूक स्वतंत्र लढणं सोयीचं : ना. सतेज पाटील (व्हिडिओ)

स्थानिक परिस्थिती पाहता महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांनी कोल्हापूर महापालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढणे सोयीचे ठरेल असे मत पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केले.

श्री अंबाबाई, जोतिबासह मुख्य मंदिरांतील दर्शन वेळ वाढल्याने भाविकांत समाधान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर निवासिनी श्री अंबाबाई, श्री जोतिबा, दत्त भिक्षालिंगसह सर्व मंदिरांतील दर्शन वेळेत पुन्हा वाढ करण्यात आल्याने भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे. आजपासून (शुक्रवार) त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्याचप्रमाणे अभिषेकही पुन्हा सुरू झाले आहेत आणि भाविकांना ओटीचे साहित्य मंदिरात नेण्यास मुभा देण्यात आली आहे. काल (गुरुवार) पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीची मासिक… Continue reading श्री अंबाबाई, जोतिबासह मुख्य मंदिरांतील दर्शन वेळ वाढल्याने भाविकांत समाधान

शरद पवार यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवू… : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतली शपथ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचा शनिवार (दि. १२) रोजी वाढदिवस साजरा होत आहे. या निमित्त आज (शुक्रवार) कोल्हापूर दक्षिण राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सायबर चौकात पवार यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी योगदान देण्याचा शपथविधी कार्यक्रम पार पडला. कोल्हापूर दक्षिण राष्ट्रवादीचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी… Continue reading शरद पवार यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवू… : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतली शपथ

सवलतीत इलेक्ट्रॉनिक वस्तू देण्याच्या आमिषाने सात जणांना लाखोंचा गंडा : पितापुत्राविरोधात गुन्हा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : क्रोमा मॉलच्या गिफ्ट कार्डद्वारे ५० टक्के सवलतीच्या दरात इलेक्ट्रॉनिक वस्तू देण्याच्या बहाण्याने  कोल्हापुरातील सातजणांची १४ लाख १ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.  या प्रकरणी आविष्कार सुनील पाटील (वय २९) व त्याचे वडील सुनील पाटील (दोघे रा. वरळी, मुंबई) या पिता-पुत्रांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आसिफ सैदुल्ला… Continue reading सवलतीत इलेक्ट्रॉनिक वस्तू देण्याच्या आमिषाने सात जणांना लाखोंचा गंडा : पितापुत्राविरोधात गुन्हा

शिवारातील चिअर गर्ल्सच्या ठुमक्यांनी काय साध्य झाले ?

राधानगरी तालुक्यातील गवशी पैकी पाटीलवाडी येथे क्रिकेट स्पर्धेवेळी चिअर गर्ल्स थिरकल्या. त्यांच्याबरोबर काही तरुणांनीही नृत्य (?) केले. क्रिकेट स्पर्धेवेळी चिअर गर्ल्स नाचवून काय साध्य झाले ?

शियेतील घरे नियमित करण्यासाठी प्रशासनाला सूचना देऊ : पालकमंत्री  

टोप (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील शिये गावातील हनुमाननगर मधील सर्व्हे नंबर २८३ मधील घरे नियमित करण्यासाठी प्रशासनाला सूचना देऊ, असे आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले. याबाबतचे निवेदन सामाजिक कार्यकर्त्या तेजस्विनी अभिजित पाटील यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना दिले.  या निवेदनात म्हटले आहे की, करवीर तालुक्यातील शिये गावातील हनुमाननगर २८३ सर्व्हे नंबरमध्ये १९६३ सालापासून सुमारे… Continue reading शियेतील घरे नियमित करण्यासाठी प्रशासनाला सूचना देऊ : पालकमंत्री  

error: Content is protected !!