चंद्रकांतदादा, पैसे देऊन जिवाभावाचे कार्यकर्ते मिळत नाहीत ! : ना. हसन मुश्रीफ (व्हिडिओ)

पैसे देऊन जिवाभावाचे कार्यकर्ते मिळत नाहीत त्यासाठी जनतेच्या सेवेत चोवीस तास राहावे लागते, असा टोला ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी महाविकास आघाडीच्या नूतन पदवीधर, शिक्षक आमदारांच्या सत्कारावेळी चंद्रकांतदादा पाटील यांना लगावला.  

मुश्रीफसाहेब… तर राजाराम कारखानाही आमचा असता ! : ना. सतेज पाटील (व्हिडिओ)

मुश्रीफसाहेब, मागील वेळी खा. धैर्यशील माने आमच्यासोबत असते तर राजाराम कारखान्यावर आमची सत्ता आली असती असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नूतन पदवीधर, शिक्षक आमदारांच्या सत्कारावेळी व्यक्त केला.  

आता सरकारी कर्मचाऱ्यांनाही ड्रेसकोड लागू

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारी कर्मचाऱ्यांची जनमानसातील प्रतिमा आदर्शवत होण्यासाठी त्यांना ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. सरकारी कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत याबाबतच्या मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने प्रसिद्ध केल्या आहेत. अधिकारी व कर्मचारी यांची वेशभूषा ही अशोभनीय, गबाळी तसेच अस्वच्छ असल्याचा त्याचा परिणाम एकदंरीतच कामकाजावर होतो. त्यामुळे ड्रेसकोड लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.… Continue reading आता सरकारी कर्मचाऱ्यांनाही ड्रेसकोड लागू

चरण येथील जवान अमित साळुंखे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये (सीआरपीएफ) कर्तव्य बजावणारे चरण (ता.शाहूवाडी) येथील जवान अमित भगवान साळुंखे (वय३०) यांचे गुरूवारी (दि.१०) सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे चरण गावात शोककळा पसरली आहे. अमित साळुंखे  बालाघाट (मध्यप्रदेश) येथे कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते.  त्यांचे प्राथमिक शिक्षण रामगिरी विद्यालय चरण येथे तर बारावी पर्यंतचे शिक्षण सरुड महाविद्यालयात… Continue reading चरण येथील जवान अमित साळुंखे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

राज्यातील १४ हजारांवर ग्रामपंचायतींसाठी जानेवारीत मतदान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मुदत संपलेल्या राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्हयातील ४३३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यासाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित गावातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. कोरोनामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. पण आता कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने प्रलंबित निवडणुका घेतल्या जात… Continue reading राज्यातील १४ हजारांवर ग्रामपंचायतींसाठी जानेवारीत मतदान

‘कृषी कायद्यात बदल करण्यास तयार, आंदोलन मागे घ्या…’

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्या कृषी कायद्याविरोधात नवी दिल्लीत मागील दोन आठवड्यापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारशी शेतकरी नेत्यांच्या चर्चेच्या पाच फेऱ्या झाल्या होत्या. मात्र, तोडगा निघाला नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेली चर्चा ही निष्फळ ठरली. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन आणखीनच तीव्र केले. कृषी कायद्यात बदल करण्यास केंद्र सरकार तयार असून शेतकऱ्यांनी आंदोलन… Continue reading ‘कृषी कायद्यात बदल करण्यास तयार, आंदोलन मागे घ्या…’

शेतकरी आंदोलनावरून शरद पवारांची केंद्र सरकारवर टीका

मुंबई (प्रतिनिधी) : सुधारित कृषी कायद्यावरून गेल्या १५ दिवसांपासून शेतकऱ्यांचे दिल्लीत देशव्यापी आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. दरम्यान, गेल्या सप्टेंबर महिन्यात केंद्र सरकारने शेतीशी संबंधित तीन कायदे संसदेत मंजूर केले होते. हे कायदे उद्योगपतींच्या फायद्यासाठी आणण्यात आले असल्याचा आरोप करत शेतकरी संघटनांने तीव्र आंदोलन सुरु आहे.… Continue reading शेतकरी आंदोलनावरून शरद पवारांची केंद्र सरकारवर टीका

भिवंडी येथे चार मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले…

भिवंडी (प्रतिनिधी) : आईसह तीन चिमुकल्यांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळाल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या दोन महिन्यापासून बेपत्ता असलेल्या आईसह तीन मुलांचे मृतदेह आढळून आले. ही घटना भिवंडीतील उबंरखांड पाच्छापूर जंगलात घडली आहे. पत्नी आणि तिन्ही मुलांचे मृतदेह पाहून वडिलांनी देखील विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. श्रीपत बच्चू बांगारे असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न… Continue reading भिवंडी येथे चार मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले…

सुट्टीदिवशीही जिल्ह्यात ‘हे’ शासकीय कार्यालय सुरू राहणार…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शासनाने दस्त नोंदणीमध्ये मुद्रांक शुल्कात विशेष सवलत दिली असल्यामुळे जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीचे कामकाज वाढले आहे. मुद्रांक शुल्क सवलतीचा सर्वसामान्य जनतेला लाभ घेता यावा यासाठी जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालये १२, १९, २६ डिसेंबर या शासकीय सुट्टीदिवशी सुरू ठेवण्यात येणार आहेत. संबंधितांनी या विशेष सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा निबंधक… Continue reading सुट्टीदिवशीही जिल्ह्यात ‘हे’ शासकीय कार्यालय सुरू राहणार…

मुंबईसह अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी

पुणे (प्रतिनिधी) : राज्यात अनेक ठिकाणी आज (शुक्रवारी) सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. सकाळपासून मुंबईसह नवी मुंबई, वसई, पालघर, रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. तर पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. पुण्याच्या ग्रामीण भागातही ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, उत्तर महाराष्ट्रात येत्या तीन दिवसांत गारपिटीची शक्यता वर्तवली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या… Continue reading मुंबईसह अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी

error: Content is protected !!