कोल्हापूर ( प्रतिनिधी ) गोकुळच्यावतीने दूधवाढ कृती कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवला जात आहे. या म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रमांतर्गत घोटवडे ता.राधानगरी येथे दूध उत्पादकांनी मुऱ्हा जातीच्या 20 म्हैशी वाराणसी (उत्तरप्रदेश) येथून खरेदी केलेल्या म्हैशी घोटवडे ता. राधानगरी येथे गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते दूध उत्पादकांना प्रदान करण्यात आल्या.

यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, गोकुळकडून म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रम दूध उत्‍पादक, शेतक-यासाठी मोठ्या प्रामाणावर राबवला जात आहे. या अनुषंगाने परराज्यातून म्हैस खरेदी करण्याच्या आवाहनास चांगला प्रतिसाद मिळत असून यामध्ये युवा दूध उत्पादकांचा सहभाग वाढत आहे. भविष्यात ही युवकांनी दूग्ध व्यवसायाच्या माध्यमातून आपली आर्थिक प्रगती साधावी असे आवाहन याप्रसंगी व्यक्त केले.

यावेळी उपस्थित भोगावती साखर कारखान्याचे संचालक धिरज डोंगळे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगळे, शाकिर पाटील, संकलन अधिकारी सर्जेराव पाटील, सहा. अधिकारी राजू चौगले, सुहास डोंगळे, शिवाजी डोंगळे, पशुसंवर्धन डॉ.संजय डोंगळे, सचिव संघटना जिल्हाध्यक्ष के.द.पाटील, प्रकाश कातिवले, दयानंद कातिवले, अतुल डोंगळे, राजाराम डोंगळे सर्व संचालक यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, तसेच गावातील सर्व दूध संस्थांचे पदाधिकारी व दूध उत्पादक सभासद उपस्थित होते.