कळे (प्रतिनिधी) : कळे पोलीस ठाण्याअंतर्गत काही दिवसांपूर्वी मास्क न वापरणाऱ्या आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची बातमी लाईव्ह मराठीकडून प्रसिद्ध झाली होती.
सध्या सगळीकडे किती जणांवर कारवाई झाली आणि किती दंड वसूल झाला, या बातम्या प्रसिद्ध होत असताना कळे पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मात्र ही माहिती देण्यास टाळाटाळ होत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाविषयी आणि त्यांच्या कारभाराविषयी नागरिकांमधून शंका व्यक्त होत आहे. तरी जिल्हा वरिष्ठ पातळीवर याची दखल घेणे गरजेचे आहे.