देवगड (प्रतिनिधी) : साळशी येथिल श्री गांगेश्र्वर विठ्ठलाईदेवी सेवा संस्था साळशी-परबवाडी यांच्या विद्यमाने श्री गांगेश्र्वर विठ्ठलाईदेवी कुलदेवता मंदिराचा सहावा वर्धापनदिन सोहळा ९ मे रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

तर ९ मे रोजी सकाळी ९ वाजता अभिषेक, सायंकाळी ४ वाजता श्री सत्यनारायण महापुजा, ६ वाजता स्थानिक भजने, ७ ते रात्रौ ९ वाजेपर्यंत महाप्रसाद, १० वाजता मालवण तालुक्यातील आचरा-देऊळवाडी येथील श्री विठ्ठल रखुमाई दिंडी भजनाचा कार्यक्रम होणार आहे.

या वर्धापनदिन सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री गांगेश्र्वर विठ्ठलाई देवी मंडळ साळशी-परबवाडी, श्री देव सिध्देश्वर पावणाई इनाम देवस्थान ट्रस्ट साळशी,बारा-पाच मानकऱ्यांनी केले आहे.