टोप (प्रतिनिधी) : टोप, संभापूर, कासारवाडी, अंबप, नागाव ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रचाराला सुरवातही झाली आहे. यापूर्वी अनेक इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज हातकणंगले येथे दाखल केले होते. आज सोमवारी अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडली.

यामध्ये टोप (सरपंचपदासाठी ५, सदस्य ४३),  कासारवाडी (सरपंच- १६, सदस्य- ३३), संभापूर (सरपंच- ४ सदस्य ३८),  नागाव (सरपंच- ९, सदस्य ७१) या गावांतील सर्व अर्ज वैध झाले. अंबपमध्ये सरपंचपदासाठी ९ अर्ज वैध, तर सदस्यपदासाठी १२६ अर्ज दाखल झाले होते त्यातील ६ अवैद्य झाले. यामुळे इच्छुकांमधून नाराजीचा सूर पाहावयास मिळाला. ज्या उमेदवारांचे अर्ज वैध झाले त्यांनी आता प्रचार सुरु केला आहे. हळूहळू प्रचाराला गती येईल. ७ डिसेंबर रोजी माघारीनंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे. पण सर्वच गावांत नेत्याच्या प्रतिष्ठा पणास लागल्या आहेत.