कोल्हापूर ( प्रतिनिधी ) शिंदे गटांच्या आमदार पात्रतेचा निकाल काही तासांवर येऊन ठेपला आहे. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी कोल्हापुरात आगमन होताच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेलक्या शब्दात निशाणा साधला.

पुढे बोलताना ते म्हणाले की, देशामध्ये संविधान टीकणार की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर नाव खराब करून घेणार नाहीत, भाजपला जे संविधान लिहायचा आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान बदलायचं असेल तरच आम्ही बाद होऊ अन्यथा आम्हाला न्याय मिळेल अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे आणि भाजपचा समाचार घेतला आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भेटीवरुन ही कडाडून टीका केली. न्यायमूर्ती आरोपींच्या भेटीला गेले, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी दोघांच्या भेटीवर हल्लाबोल केला. यावेळी आपला संविधानावर विश्वास असून आम्हाला योग्य न्याय मिळेल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे.