टोप (प्रतिनिधी) : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मनुग्राफ कंपनीसमोर आज (रविवार) सायंकाळी मोटरसायकल घसरून झालेल्या अपघातात कर्नाटकातील एका तरूणाचा जागीच मृत्यू झाला आहे. अभिषेक मल्लेशी सोगलाड (वय २५, रा. पुरगुंडूळी ता. खानापूर, जि. बेळगाव) असे त्याचे नाव आहे.

सोगलाड हा गवंडीकाम करत असून तो आज सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कर्नाटक येथून पारगावकडे जात होता. त्यावेळी मनूग्राफ कंपनीसमोर अचानकपणे मोटरसायकल घसरल्याने त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. परंतु, या मयताच्या खिश्यामध्ये आणि गाडीला नंबर प्लेट नसल्यामुळे पोलिसांना कोणत्याही प्रकारचे ओळख सापडत नव्हती. परंतु, या तरूणाच्या मोबाईलवर त्याच्या मित्राचा फोन आल्याने तो कर्नाटकातील असल्याचे निष्पन्न झाले. या अपघाताची नोंद शिरोली पोलिस ठाण्यात झाली आहे.