पन्हाळा (प्रतिनिधी) : कोतोली-नांदगाव रस्त्यावर उंड्री गावाजवळ मोटरसायकल घसरून सागर महादेव पाटील या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना काल (मंगळवार) सायंकाळच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, शाहूवाडी तालुक्यातील नांदगाव येथील सागर महादेव पाटील-कोगे हा आपली मोटरसायकल घेऊन कोतोलीकडे जात होता. पन्हाळा तालुक्यातील उंड्री गावाजवळ नवीन केलेल्या सिमेंटच्या रस्त्यावर त्याची मोटरसायकल अचानक घसरली. यात तो गंभीर जखमी होवून त्याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची नोंद पन्हाळा पोलिसात झाली आहे. सागरच्या मागे आई-वडील, पत्नी व इयत्ता पहिलीच्या वर्गात शिकणारी लहान मुलगी आहे. अचानक घडलेल्या अपघातामुळे नांदगाव गावावर शोककळा पसरली आहे.