कोल्हापूर (प्रतिनिधी) : आझादी का अमृत महोत्सवांतर्गत महापालिकेच्या वतीने अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे झाला. या कार्यक्रमाची सुरुवात प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली.

यावेळी महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन देशभक्तीपर समूह गीते व नुत्य यांचे अप्रतिम सादरीकरण केले. यामध्ये राष्ट्रभक्तीपर २२ गीतांनी कार्यक्रमाची रंगत वाढविली विशेष म्हणजे सहायक आयुक्त विनायक औंधकर, यांनी जहाँ डाल डाल पर रहैती है सोने की चिडीया हे गाणे सादर केले. मुख्य लेखापाल संजय सरनाईक, सहायक अभियंता सतीश फप्पे परवाणा अधिक्षक राम काटकर, कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले  यांनी गाणी सादर करताच प्रेक्षकांनी भभरुन दाद दिली. यावेळी महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांनीही देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले. या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, उपायुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर यांचे विशेष सहकार्य लाभले. सूत्रसंचालन विजय वनकुंद्रे व पंडित कंदले यांनी, नेटके नियोजन सहायक आयुक्त विनायक औंधकर, मदन ठाणेकर यांनी, तर सुतार बंधू झंकार बिट्स ऑर्केस्ट्रा यांनी या कार्याक्रमाला संगीत दिले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त नितिन देसाई, सहायक आयुक्त संदीप घार्गे, सहायक संचालक नगररचना रामचंद्र महाजन, शहर भियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजित घाटणे, उपशहर रचनाकार रमेश मस्कर उपशहर अभियंता एन. एस. पाटील, नारायण भोसले, बाबूराव दबडे, प्रशांत पंडत, नगरससिव सुनील बिद्रे, संजय भोसले, कर निर्धारक व संग्रहक सुधाकर चलावड, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.