रांची ( वृत्तसंस्था ) झारखंडमधील दुमका जिल्ह्यात एका स्पॅनिश महिलेवर 7 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

ही घटना रांचीपासून 300 किमी अंतरावर असलेल्या हंसदिहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुरुमहाटमध्ये घडली आहे. घटनेच्या दिवशी ही स्पॅनिश महिला तिच्या जोडीदारासोबत तंबूत झोपली होती. हे दाम्पत्य बांगलादेशातून दुचाकीवरून दुमका येथे पोहोचले होते आणि त्यांना बिहारमार्गे नेपाळला जाणार होते दरम्यान विश्रांती घेत असताना हा प्रकार घडला आहे.

35 वर्षीय परदेशी महिलेने सांगितली आपबिती

हे जोडपे दुमकामार्गे भागलपूरच्या दिशेने जात होते आणि रात्री त्यांनी दुमकाच्या हंसदिहा बाजाराजवळ एका निर्जन भागात तंबू ठोकला होता. वृत्तानुसार, एका टोळीने या जोडप्याला मंडपात पाहिले. त्यांनी त्यांना मारहाण करून महिलेवर सामूहिक बलात्कार केला. घटनेनंतर, सुमारे 35 वयाच्या पीडितेने पोलिसांचे पेट्रोलिंग वाहन थांबवले आणि त्यांना घटनेची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी महिलेला रुग्णालयात नेले.

पोलिसांनी एफआयआर नोंदवला

द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना, दुमका जिल्हा सिव्हिल सर्जन बी पी सिंग म्हणाले, “मला पोलिसांनी विदेशी महिलेवर कथित सामूहिक बलात्काराची माहिती दिली होती. वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. पीडितेचा जबाब नोंदवला जात आहे. पोलिस एफआयआर नोंदवत आहेत.