कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने शेतकरी मासिक वाचन सप्ताह सुरू करण्यात आला आहे. तरी याचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घेवून शेतकरी मासिकाचे वर्गणीदार व्हावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी भीमाशंकर पाटील यांनी केले.

भीमाशंकर पाटील म्हणाले की, कृषी विभागामार्फत १९६५ पासून शेतकरी मासिक शेतकऱ्यांच्या सेवार्थ दर महिना प्रसिद्ध केले जाते. यामध्ये कृषी विद्यापीठाचे आणि कृषी, संलग्न विभागाच्या अधिकाऱ्यांचे माहितीपूर्ण लेख असतात. शेती पूरक व्यवसाय, कृषी प्रक्रिया, बाजार व्यवस्थापन, निर्यातक्षम शेतीसाठी महत्त्वाचे निकष, राष्ट्रीयकृत बँकांमार्फत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांची मदतीबद्दल माहिती दिली जाते. या शेतकरी मासिकाची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्हावी, यासाठी ८ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर पर्यंत जिल्ह्यात शेतकरी मासिक वाचन सप्ताह सुरुवात करण्यात आली आहे.

तरी या मासिकाचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घेवून शेतकरी मासिकाचे वर्गणीदार व्हावे. असे आवाहन जि.प.चे कृषी विकास अधिकारी भीमाशंकर पाटील यांनी केले आहे.