कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (सोमवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात ५१ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान दिवसभरात १३१ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ५०६ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
आज सायंकाळी ७ वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरातील १५, आजरा तालुक्यातील १, भूदरगड तालुक्यातील २, चंदगड तालुक्यातील १, गडहिंग्लज तालुक्यातील २, गगनबावडा तालुक्यातील ४, हातकणंगले तालुक्यातील ४, कागल तालुक्यातील २, करवीर तालुक्यातील १, पन्हाळा तालुक्यातील १, शाहूवाडी तालुक्यातील ६, इचलकरंजी सह नगरपालिका क्षेत्रातील ७ आणि इतर जिल्ह्यातील ५ अशा एकूण ५१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर इचलकरंजी येथील १, कोल्हापूर २ आणि राधानगरी येथील १ अशा एकूण ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर १३१ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
आज अखेर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या : ४७,४२७
एकूण डिस्चार्ज : ४३,७५९
उपचारासाठी दाखल रुग्ण : २०६८
एकूण मृत्यू : १६००