छत्तीसगढ (वृत्तसंस्था) : छत्तीसगढमधील विजापूरच्या जंगलात बेपत्ता झालेल्या १४ जवानांचे मृतदेह आज रविवारी) जंगलात सापडले आहेत. तर अद्याप १ जवान बेपत्ता आहेत. आतापर्यंत झालेल्या या चकमकीत २२ जवान शहीद झाले आहेत. तर १५ नक्षली ठार झाले आहेत. या धुमश्चक्रीत तब्बल ३१ जवान जखमी झाले असून त्यांना तातडीने विजापूर येथील रुग्णालयात दाखल केले आहे. तर ७ जवानांना रायपूर येथील रुग्णालयात हलवले आहे, अशी माहिती सीआरपीएफचे महासंचालक कुलदीप सिंह यांनी दिली.  

सुरक्षा दलांचे संयुक्त पथक सुकमा आणि विजापूर सीमेवरील तारेम परिसरात शनिवारी नक्षलविरोधी कारवाई करीत असताना अचानक चकमक उडाली. यात ५ जवान शहीद झाले होते. तर १४ जवान बेपत्ता झाले होते. बेपत्ता जवानांच्या शोधासाठी रविवारी सकाळी सुकमा आणि विजापूर सीमा परिसरात मोहीम हाती घेतली. यावेळी १४ जवानांचे मृतदेह जंगलात सापडले आहेत. तर एकूण २२ जवान शहीद झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.