‘माझी वसुंधरा’ अभियानात सर्वांनी सहभाग घ्यावा : डॉ. कादंबरी बलकवडे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : माझी वसुंधरा अभियान कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात गतीमान करण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धनाच्या या उपक्रमात शहरातील विविध सेवाभावी-स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांनी सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले. कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात माझी वसुंधरा अभियान २ ऑक्टोबर पासून राबविण्यात येत आहे. आज महानगरपालिकेच्यावतीने सर्किट हाऊस आणि सम्राटनगर परिसरामध्ये आयुक्तांच्या हस्ते… Continue reading ‘माझी वसुंधरा’ अभियानात सर्वांनी सहभाग घ्यावा : डॉ. कादंबरी बलकवडे

गटनेते शारंगधर देशमुख यांची सामाजिक बांधिलकी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी यावर्षी आपला वाढदिवस साजरा न करता २०१९ च्या पुरामध्ये लक्ष्मीपुरी कामगार चाळ येथील पडलेली ३ घरे बांधून दिली. या नवीन बांधण्यात आलेल्या ३ घरांच्या चाव्या संबंधितांना देण्याचा सोहळा आ. ऋतुराज पाटील, आ. चंद्रकांत जाधव, महापौर निलोफर आजरेकर, गटनेते शारंगधर देशमुख यांच्या हस्ते आज (रविवार) पार पडला.… Continue reading गटनेते शारंगधर देशमुख यांची सामाजिक बांधिलकी

हरिओम नगरात १०० दुर्मिळ औषधी वनस्पतीची लागवड

कोल्हापूर (प्रतिनिधी) : वृक्षप्रेमी वेलफेअर ऑर्गनायझेशन संस्थेमार्फत हरिओम नगर, सानेगुरुजी वसाहत येथे ऑक्सीजन पार्क आणि सीड बँक तयार करण्याच्या दृष्टिकोनातून दुर्मिळ होत चाललेल्या आणि औषधी अशा १०० वनस्पतीची लागवड करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने मुचकुंद, नागकेशर ब्रहादंड, बिक्सा, गुळभेंडी धावडा, शेंद्री पांढारी सावर, कदंब, कांचन अशा वृक्षाचा समावेश होता. यावेळी गटनेते शारंगधर देशमुख, अमृत चित्रगार, वृक्षप्रेमी… Continue reading हरिओम नगरात १०० दुर्मिळ औषधी वनस्पतीची लागवड

राष्ट्रवादीच्या नेत्या पोहोचल्या गनिमी काव्याने बेळगावात

कोल्हापूर (प्रतिनिधी) : बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आज  (१ नोव्हेंबर) ‘काळा दिवस’  पाळला जात आहे. भाषावर प्रांतरचनेवेळी बेळगावसह सीमावर्ती मराठीबहुल भाग कर्नाटकात डांबल्याच्या निषेधार्थ हा दिवस पाळला जातो. यानिमित्त समितीने आयोजित मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर अक्षरश: गनिमी काव्याने उपस्थित राहिल्या. त्यांना बेळगावात पोहोचण्यासाठी काही अंतर रिक्षाने प्रवास करावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष… Continue reading राष्ट्रवादीच्या नेत्या पोहोचल्या गनिमी काव्याने बेळगावात

घातक शस्त्रांची विक्री करणाऱ्या एकास अटक

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  अंबाई टँक परिसरात घातक शस्त्रांची विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला जुना राजवाडा पोलिसांनी सापळा रचून अटक केली. किशोर भगवान मेस्त्री (वय ३१ रा. मुळगाव पाठपरोळे कुडाळ, सध्या रा. लक्षतीर्थ वसाहत) असे अटक केलेल्या आरोपीचे  नाव आहे. त्याच्याकडून चार तलवारी,  एक मोटर सायकल एक मोबाईल हँडसेट असा सुमारे ६६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत… Continue reading घातक शस्त्रांची विक्री करणाऱ्या एकास अटक

संजय राऊत जगभरातील १८२ देशांचे राष्ट्रप्रमुख

पुणे (प्रतिनिधी) : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा  शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.  संजय राऊत जगभरातील १८२ देशांचे राष्ट्रप्रमुख आहेत. इतक्या वर्षानंतर या जगामध्ये राऊतांसारखे व्यक्तिमत्व निर्माण झालेले नाही.  त्यांच्याकडे तर संपूर्ण जगातल्या विषयावर मत आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी मी काय बोलणार, अशा खोचक शब्दांत पाटील यांनी त्यांच्यावर… Continue reading संजय राऊत जगभरातील १८२ देशांचे राष्ट्रप्रमुख

स्वच्छता मोहिमेत ३ टन कचरा गोळा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिकेतर्फे राबवण्यात येत असलेल्या आजच्या ७९ व्या स्वच्छता मोहिमेत शहरातील प्रमुख चौक, उद्याने आणि रस्त्यांवर स्वच्छता करण्यात आली. शाहू उद्यान, सानेगुरुजी वसाहत तसेच सर्किट हाऊस परिसरातील ३ टन कचरा संकलित करण्यात आले. आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आजच्या (रविवार) स्वच्छता मोहिमेतून शहरातील प्रमुख चौक आणि रस्ते, गटारी, नाले, फुटपाथ, घाट तसेच… Continue reading स्वच्छता मोहिमेत ३ टन कचरा गोळा

लक्ष्मीपुरीत भरधाव कारच्या धडकेत मुलगा गंभीर जखमी

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  लक्ष्मीपुरी येथे कारच्या धडकेत मुलगा गंभीर जखमी झाला. सार्थक अनिल कुऱ्हाडे (वय१४ रा. वळीवडे, ता करवीर)  असे जखमी मुलाचे नाव आहे. याप्रकरणी त्याची आई पूजा अनिल कुऱ्हाडे (वय३३ रा. वळीवडे ता. करवीर) यांनी रोहित विकास पाटील (वय २० रा. फुलेवाडी रिंगरोड) या कार चालकांविरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी… Continue reading लक्ष्मीपुरीत भरधाव कारच्या धडकेत मुलगा गंभीर जखमी

सेनेचे मंत्री म्हणतात, ‘आमचं ठरलंय..’

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहर आणि जिल्हयातील शिवसेनेतील गटबाजीला थारा मिळणार नाही. एकसंघपणे कार्यकर्त्यांनी निष्ठेने काम करून पुन्हा शिवसेनेला गतवैभव मिळवून द्यायचे आहे. येत्या काही दिवसांत आघाडीचे सरकार म्हणून ग्रामविकास मंत्री हसन मुंश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासोबत बैठक घेऊन विविध शासकीय समित्यांमधील निवडीसंबंधी चर्चा करणार आहे. सर्वच समित्यांमध्ये राज्यात ज्याप्रमाणे सत्तेचे सूत्र ठरले आहे, त्याप्रमाणे… Continue reading सेनेचे मंत्री म्हणतात, ‘आमचं ठरलंय..’

‘दख्खनचा राजा जोतिबा’ या मालिकेला नव्हे, ‘यास’ विरोध…      

जोतिबा (प्रतिनिधी) :  सध्या ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवर सुरू असलेली कोठारे व्हिजन ची ‘दख्खनचा राजा जोतिबा’ ही मालिका वादाच्या भोवऱ्यात अडकलेली आहे. या मालिकेची कथा श्री जोतिबाच्या कथेला अनुसरून नाही, श्री जोतिबाचा मूळ ग्रंथ ‘केदार विजय’ या ग्रंथाचा आधार मालिकेचे लेखक डॉ. ठोंबरे यांनी घेतलेला नाही, असा दावा येथील पुजारी वर्गाने तसेच अभ्यासू भक्तगण यांनी… Continue reading ‘दख्खनचा राजा जोतिबा’ या मालिकेला नव्हे, ‘यास’ विरोध…      

error: Content is protected !!