कोल्हापूर (प्रतिनिधी) : माझी वसुंधरा अभियान कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात गतीमान करण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धनाच्या या उपक्रमात शहरातील विविध सेवाभावी-स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांनी सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले.

कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात माझी वसुंधरा अभियान २ ऑक्टोबर पासून राबविण्यात येत आहे. आज महानगरपालिकेच्यावतीने सर्किट हाऊस आणि सम्राटनगर परिसरामध्ये आयुक्तांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम विवेकानंद कॉलेजचे एनसीसीचे विद्यार्थी, उद्यान विभाग अधीनस्थ कर्मचारी यांच्या सहकार्याने पार पडला. माझी वसुंधरा अभियानांतर्गत कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात वृक्षारोपणाची व वृक्षसंवर्धनाची मोहिम गतीमान करण्यात आल्याचेही, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे म्हणाल्या.

यावेळी पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, उद्यान अधीक्षक खाडे,  सहा उद्यान अधीक्षक राम चव्हाण, आरोग्य निरीक्षक आदिजण उपस्थित होते.