मराठा नेत्यांनो, पक्ष बाजूला ठेवून आंदोलनात सहभागी व्हा : दिलीप पाटील (व्हिडिओ)

मराठा आरक्षणासाठी राजकीय नेत्यांनी पक्ष बाजूला ठेवून आंदोलनात सहभागी व्हावं, असं आवाहन सकल मराठा समाजाचे समन्वयक दिलीप पाटील यांनी केलं.  

शिवसेना नेता म्हणतो, ‘महाविकास आघाडीच्या नव्हे, अपक्ष उमेदवाराला मतदान करा..?

औरंगाबाद (प्रतिनिधी) : राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठी मतदान होणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेससह मित्रपक्षांची महाविकास आघाडी आणि भाजप व मित्रपक्ष यांच्यात थेट लढत होत आहे. त्याचप्रमाणे काही वंचित बहुजन आघाडीसह अपक्ष उमेदवारही निवडणूक लढवत आहेत. असे असताना शिवसेनेच्या एका नेत्याने महाविकास आघाडीच्या उमेदवाराऐवजी चक्क अपक्ष उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केल्याची ऑडिओ क्लीप… Continue reading शिवसेना नेता म्हणतो, ‘महाविकास आघाडीच्या नव्हे, अपक्ष उमेदवाराला मतदान करा..?

पदवीधर, शिक्षक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात चोख पोलीस बंदोबस्त..

कोल्हापूर (प्रतिनिधी) : उद्या होणाऱ्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.१ डिसेंबर २०२० रोजी पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. ही निवडणूक सुरळीत पार पडावी, तसेच या निवडणुकीमध्ये कोणताही गैरप्रकार घडू नये, यासाठी कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यातील २८१ मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला… Continue reading पदवीधर, शिक्षक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात चोख पोलीस बंदोबस्त..

कोरोना अपडेट : दिवसभरात १६०१ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (सोमवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात २० जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान दिवसभरात ५५ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १६०१ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज सायंकाळी ६.३० वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार… Continue reading कोरोना अपडेट : दिवसभरात १६०१ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह

‘पुणे पदवीधर, शिक्षक’साठी जिल्ह्यातील २८१ केंद्रांंवर उद्या मतदान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी उद्या (मंगळवार) १ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील २८१ मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. जिल्हा प्रशासनाने यासाठीची सर्व तयारी पूर्ण केली आहे. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन तैनात करण्यात आले आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजप मित्रपक्षांमध्ये लढत होत असल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ… Continue reading ‘पुणे पदवीधर, शिक्षक’साठी जिल्ह्यातील २८१ केंद्रांंवर उद्या मतदान

…तर जयंत पाटील हे भाजप सरकारमध्ये मंत्री झाले असते : नारायण राणे

रत्नागिरी (प्रतिनिधी) : सध्या राज्यात जरी महाविकास आघाडीचे सरकार असले, तरी जर राज्यात भाजपचे सरकार असते तर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे भाजपमध्ये असते, एवढेच नव्हे, मंत्रीपदावर असते, असा खळबळजनक दावा भाजपचे नेते नारायण राणे यांनी केला. ते आज (सोमवार) रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलत होते. दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या पदवीधर मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारसभेत जयंत पाटील… Continue reading …तर जयंत पाटील हे भाजप सरकारमध्ये मंत्री झाले असते : नारायण राणे

कोरोनाची दुसरी लाट..? ; मोदींनी ४ डिसेंबरला बोलावली सर्वपक्षीय बैठक

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  तर काही राज्यांमध्ये पुन्हा गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारी घेत उपाययोजना आखण्यास सुरूवात केली आहे. याबाबत विचारविनिमय करण्यासाठी ४ डिसेंबररोजी सर्वपक्षीय बैठक बोलविण्यात आली आहे. यावेळी पंतप्रधान मोदी सर्व पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. राज्यसभा आणि लोकसभेच्या सर्व खासदारांसोबत… Continue reading कोरोनाची दुसरी लाट..? ; मोदींनी ४ डिसेंबरला बोलावली सर्वपक्षीय बैठक

शीतल आमटेंच्या आत्महत्येपूर्वी काय घडले..?

चंद्रपूर (प्रतिनिधी) : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आत्महत्या केली. आनंदवन येथील राहत्या घरी विषाचे इंजेक्शन घेऊन त्यांनी आयुष्य संपवले. नातेसंबंध आणि महारोगी सेवा समितीमधील कलहाचा त्रास सहन न झाल्याने त्यांनी आत्महत्या केली असावी असेही सांगितले जात आहे. आनंदवनातील महारोगी सेवा समितीचे काम आधी विकास आमटे ह्यांचा मुलगा… Continue reading शीतल आमटेंच्या आत्महत्येपूर्वी काय घडले..?

वर्षानुवर्षे शेतकऱ्यांचा छळ करणाऱ्यांकडूनच कृषी कायद्यांबद्दल अपप्रचार : पंतप्रधान

वाराणसी (वृत्तसंस्था) : कृषी विधेयकांसंदर्भात संभ्रमाचं वातावरण निर्माण केलं जात आहे. कृषी विधेयकांसंदर्भात प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे. मात्र, अनेक वर्ष शेतकऱ्यांचा छळ करणारेच आता कृषी कायद्यांविरोधात गैरसमज पसरवत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. ते आज (सोमवार) वाराणसीत बोलत होते. दिल्लीच्या सीमेवर नवे कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी मागील पाच दिवसांपासून आंदोलन सुरु… Continue reading वर्षानुवर्षे शेतकऱ्यांचा छळ करणाऱ्यांकडूनच कृषी कायद्यांबद्दल अपप्रचार : पंतप्रधान

आत्महत्येआधी शीतल आमटेंनी केलेल्या ट्विटचा काय असेल अर्थ..?    

नागपूर (प्रतिनिधी) : ज्येष्ठ समाजसेवक स्व. बाबा आमटे यांची नात आणि डॉ. विकास आमटे यांच्या कन्या व महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे–करजगी यांनी आज (सोमवार) आत्महत्या केली. त्याआधी शीतल यांनी त्यांच्या ट्विटर आणि फेसबुकला एक पेंटिंग शेअर केली आहे. ही पेंटिंग त्यांनी स्वत: काढली आहे. या पेंटिंगवर त्यांचे नाव आणि २९ नोव्हेंबर २०२०… Continue reading आत्महत्येआधी शीतल आमटेंनी केलेल्या ट्विटचा काय असेल अर्थ..?    

error: Content is protected !!