कोल्हापूर (प्रतिनिधी) :  लक्ष्मीपुरी येथे कारच्या धडकेत मुलगा गंभीर जखमी झाला. सार्थक अनिल कुऱ्हाडे (वय१४ रा. वळीवडे, ता करवीर)  असे जखमी मुलाचे नाव आहे. याप्रकरणी त्याची आई पूजा अनिल कुऱ्हाडे (वय३३ रा. वळीवडे ता. करवीर) यांनी रोहित विकास पाटील (वय २० रा. फुलेवाडी रिंगरोड) या कार चालकांविरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  लक्ष्मीपुरी येथे सार्थक कुऱ्हाडे हा रस्ता ओलांडत असताना त्याला भरधाव कारनेची जोराची धडक दिली. त्यात सार्थक कुऱ्हाडे गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. याप्रकरणी   रोहित पाटील या कार चालकांविरोधात लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.