दीड कोटींचा मोदी बोकड…

सांगली (प्रतिनिधी) : पाच-पन्नास हजाराचा नव्हे, तर चक्क दीड कोटीचा बोकड सांगलीच्या आटपाडीतील बाजारात विक्रीला आला होता. किंमती प्रमाणे त्याचे नावही आश्चर्च चकित करणारे आहे. त्याचे नाव मोदी असे आहे. या बोकडाला ७० लाखांना मागणी करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या आटपाडीच्या बाजारात कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने बाजार भरला होता. या बाजारात सांगोला तालुक्यातील चांडोलवाडी… Continue reading दीड कोटींचा मोदी बोकड…

मोबाईलवर ऑनलाईन सट्टा घेणाऱ्या फरारी गुन्हेगाराला अटक…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शाहूपुरी येथील मोबाईलवर ऑनलाईन जुगार सट्टा घेणाऱ्या फरारी झालेल्या आणखी एकास आज (रविवारी) शहर पोलीस उपाधीक्षकांच्या पथकाने अटक केली. वासिम युनूस नाखवा (रा. मंगळवार पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शाहूपुरी येथील पाचव्या गल्लीमध्ये राहुल बने हा मोबाईलद्वारे वेबसाईट… Continue reading मोबाईलवर ऑनलाईन सट्टा घेणाऱ्या फरारी गुन्हेगाराला अटक…

राशिवडे येथे शहिदांना कँडलमार्चद्वारे आदरांजली…

राशिवडे (प्रतिनिधी) : राशिवडे येथील शिवबा प्रतिष्ठानच्या वतीने काल (शनिवार) सायंकाळी नवश्या गणपती चौकात पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद झालेल्या शहीदांना कॅन्डल मार्चद्वारे आदरांजली वाहण्यात आली. यामध्ये ग्रामस्थ, दिलिपराज तरुण मंडळ, बिरदेव तरुण मंडळ, राजे तरुण मंडळ, डॅश बॉईज, नागेश्वर तरुण क्लासमेंट क्लबचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सरवडे येथे भीषण अपघात : दोघांचा मृत्यू

गारगोटी (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील सरवडे येथे शिवाजीराव खोराटे हायस्कूलच्या समोर एसटी बस आणि मोटरसायकल यांच्यामध्ये भीषण अपघात झाला. यामध्ये एक तरुण आणि वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला. राधानगरी-मुदाळतिट्टा रोडवर शिवाजीराव खोराटे हायस्कूलच्यासमोर राधानगरीकडून मुदाळतिट्टाकडे जाणारी एसटी क्र. एमएच १२ ईएफ ६४८८ आणि मुदाळतिट्टाकडून राधानगरीकडे जाणारी स्प्लेंडर मोटर सायकल क्र. एमएच ०९ एडब्ल्यू २९०१ यांच्यामध्ये… Continue reading सरवडे येथे भीषण अपघात : दोघांचा मृत्यू

चंद्रकांत पाटील कधी जेलमध्ये गेलेत का ?: जयसिंगराव गायकवाड

औरंगाबाद (प्रतिनिधी) : भाजपला सोडचिठ्ठी देऊन नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या जयसिंगराव गायकवाड यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. ‘चंद्रकांत पाटील यांनी कधी आंदोलन केले आहे का, त्यांना तुरुंग आणि पोलीस कस्टडी काय असते हे माहिती आहे का?’, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ते औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी चंद्रकांत… Continue reading चंद्रकांत पाटील कधी जेलमध्ये गेलेत का ?: जयसिंगराव गायकवाड

मराठा क्रांती मोर्चा ८ डिसेंबरला विधान भवनावर धडकणार

पुणे (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाचा प्रश्न न्यायालयीन प्रक्रियेत प्रलंबित राहिला आहे. अद्याप आरक्षणावर ठोस तोडगा काढण्यात सरकारला यश आलेले नाही.  कोणत्याही सरकारला यावर ठोस निर्णय घेत आलेला नाही. यामुळे लाखो विद्यार्थ्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ८ डिसेंबर रोजी विधान भवनावर आपापल्या वाहनातून धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी… Continue reading मराठा क्रांती मोर्चा ८ डिसेंबरला विधान भवनावर धडकणार

आता विनामास्क फिरल्यास अटक होणार..!  

हिमाचल प्रदेश (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मास्क लावणे बंधनकारक आहे. मात्र, सर्रास नागरिकांनी मास्क लावणे बंद केले आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करताना दिसत नाही. ही बाब लक्षात घेता हिमाचल प्रदेश सरकारने सार्वजनिक ठिकाणी विनामास्क आढळल्यास थेट अटक करण्याचे आदेशच पोलिसांना दिले आहेत, अशी माहिती सिरमौरच्या पोलीस अधीक्षक यांनी दिली. देशात दिल्लीसह काही राज्यात… Continue reading आता विनामास्क फिरल्यास अटक होणार..!  

कोरोना महामारीतही भ्रष्टाचार : चंद्रकांत पाटील

पुणे (प्रतिनिधी) : महाविकास आघाडी सरकारला १ वर्ष पूर्ण झाले. भाजप सत्तेत येईल या भीतीने नाराज असलेले पुन्हा एकत्र येण्याचे प्रकार घडले. सरकार संपूर्णपणे गोंधळलेल्या अवस्थेत असून, वर्षभरात अनेक भ्रष्टाचार झाले आहेत. कोरोना महामारीतही भ्रष्टाचार केला. आपले वाभाडे निघतील या भितीनेच सरकार अधिवेशन घ्यायला घाबरत आहे. हिंमत असेल तर अधिवेशन घेऊन दाखवा, असे आव्हान भाजपचे… Continue reading कोरोना महामारीतही भ्रष्टाचार : चंद्रकांत पाटील

नवी दिल्ली येथे शेतकरी आक्रमक…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांना विरोध करत गेल्या चार दिवसांपासून शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाचा थेट परिणाम दिल्ली आणि आजूबाजूच्या जनजीवनावर झाल्याचं दिसून येतंय. शेतकऱ्यांचा हा पवित्रा लक्षात घेऊन केंद्र सरकार अखेर नरमलं आहे. सरकारनं शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं… Continue reading नवी दिल्ली येथे शेतकरी आक्रमक…

पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आजमवर लैंगिक शोषणाचा आरोप…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आजम याच्यावर एका महिलेनं पत्रकार परिषद घेत लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. या महिलेनं स्वत:ला बाबर आजमची शाळेतील मैत्रीण असल्याचे सांगितलं. तसेच आजमला वेळोवेळी आर्थिक मदत केल्याचा दावाही या महिलेने केला आहे. महिलेने सांगितले की, बाबर आजमला मी शाळेत असल्यापासून ओळखतेय. आम्ही एकाच ठिकाणी राहत असल्यामुळे… Continue reading पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आजमवर लैंगिक शोषणाचा आरोप…

error: Content is protected !!