गारगोटी (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील सरवडे येथे शिवाजीराव खोराटे हायस्कूलच्या समोर एसटी बस आणि मोटरसायकल यांच्यामध्ये भीषण अपघात झाला. यामध्ये एक तरुण आणि वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला.

राधानगरी-मुदाळतिट्टा रोडवर शिवाजीराव खोराटे हायस्कूलच्यासमोर राधानगरीकडून मुदाळतिट्टाकडे जाणारी एसटी क्र. एमएच १२ ईएफ ६४८८ आणि मुदाळतिट्टाकडून राधानगरीकडे जाणारी स्प्लेंडर मोटर सायकल क्र. एमएच ०९ एडब्ल्यू २९०१ यांच्यामध्ये भीषण अपघात झाला. यामध्ये मोटरसायकल चालक विठ्ठल धुळाप्पा खतकर आणि वृद्ध महिला अंबाबाई दोघे रा. भडगाव ता. कागल यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी राधानगरी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या घटनेचा पंचनामा केला.