महाविकास आघाडी सरकार महाअपयशी : केशव उपाध्ये

कोल्हापूर (प्रतिनिधी) : तीन पक्षाच्या महाविकास आघाडी सरकारला एक वर्षे पूर्ण झाले आहे. याबद्दल या सरकारचे वर्णन महाअपयशी असेच करावे लागेल, असा आरोप भाजप प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषदेत केला. ते म्हणाले, आघाडी सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. सामान्य, कष्टकरी, शेतकरी, वीज ग्राहकांना त्यांना दिलासा देता आले नाही. त्यांच्यात एकवाक्यता नाही. काँग्रेस,… Continue reading महाविकास आघाडी सरकार महाअपयशी : केशव उपाध्ये

शरद पवार यांच्याशी चर्चा करून कांही उपयोग नाही : खा. उदयनराजे भोसले

सातारा (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करून काही उपयोग नाही. भाजप नेते देवेंद्र फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री करा. मराठा समाजाला आरक्षण देण्यास त्यांना मी भाग पाडतो, असे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले. तसेच खासदार छत्रपती संभाजीराजे यांची मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदी नेमणूक करा आरक्षणाचा प्रश्न एका दिवसात सोडवतो, असेही उदयनराजे… Continue reading शरद पवार यांच्याशी चर्चा करून कांही उपयोग नाही : खा. उदयनराजे भोसले

सीबीएस परिसर झाला चकाचक..

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिकेच्यावतीने स्वच्छता मोहिमेत रस्ते, चौक, उद्याने स्वच्छ करण्यासह सीबीएसी परिसराची स्वच्छता करण्यात आली. महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी स्वत: हातात झाडू घेऊन सीबीएस परिसरात स्वच्छता केली. स्वच्छता मोहिमेतून सीबीएस परिसरासह शहरातील प्रमुख चौक, रस्ते, गटारी, नाले, फुटपाथ, घाट तसेच उद्यानामधील कचरा, प्लास्टिक, झाडांच्या फांदया कट करणे, वृक्ष लागवड, वॉल पेटींग तसेच… Continue reading सीबीएस परिसर झाला चकाचक..

उर्मिला मातोंडकर सोमवारी शिवसेनेत प्रवेश करणार ..?

मुंबई (प्रतिनिधी) : काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेली अभिनेत्री उर्मिला मातोंडकर पुन्हा राजकारणात सक्रिय होणार आहेत. त्या शिवसेनेत सोमवारी (दि.३०) प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. त्या शिवसेनेत प्रवेश करून त्यांना विधान परिषदेची आमदारकी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली होते. आता या चर्चेला दुजोरा मिळणारे वृत्त समोर आले आहे. विधान परिषदेवर नियुक्त… Continue reading उर्मिला मातोंडकर सोमवारी शिवसेनेत प्रवेश करणार ..?

देवमाणूस मालिकेतील डॉ. अजितकुमार देवचे बिंग फुटणार..?

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गावात आलेली मंजुळाची अजितला भुरळ पडली आहे. पण मंजुळाचा स्पष्टवक्तेपणा आणि स्वावलंबीपणा यामुळे अजितच्या जाळ्यात ती सहजपणे अडकत नाही. मंजुळाने वारंवार अपमान केल्याने पेटून उठलेला अजित तिच्या घरात घुसून तिने लपवलेलं रहस्य शोधायचं ठरवतो. मंजुळाच्या घरात घुसण्यात त्याला यश मिळतं पण त्याचवेळी मंजुळा घरात येते आणि अजितला खेचून दाराबाहेर आणते आणि सगळ्या… Continue reading देवमाणूस मालिकेतील डॉ. अजितकुमार देवचे बिंग फुटणार..?

मराठा आरक्षणाचा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आला :  उदयनराजेंच टीकास्त्र

सातारा (प्रतिनिधी) : ‘मराठा समाजाचं आरक्षण हे जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आलं आहे, यासाठी राज्यातील ज्येष्ठ नेतेच कारणीभूत आहेत. तेच नेते आता सत्तेत आहेत. अजून किती दिवस तुम्ही मराठा समाजाचा अंत पाहणार आहात, असा सवाल राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे. उदयनराजे म्हणाले, ‘मी माझ्यावतीनं नाही तर आपल्या पिढीच्यावतीनं आपल्या आगोदरच्या पिढीतील सर्व राजकीय नेत्यांना… Continue reading मराठा आरक्षणाचा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आला :  उदयनराजेंच टीकास्त्र

संग्राम देशमुखांच्या विजयाने यशाची परंपरा कायम राखूया : खा. सुजय विखे-पाटील

कागल (प्रतिनिधी) : बिहार विधानसभा निवडणूक आणि इतर राज्यांच्या पोटनिवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. या यशाची परंपरा पुणे पदवीधर मतदारसंघातून संग्राम देशमुख यांना विजयी करून कायम राखूया, असे आवाहन खासदार सुजय विखे-पाटील यांनी केले. कागल येथे आयोजित भाजपच्या पदवीधर मतदार आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी खा. विखे-पाटील म्हणाले की, भाजपसाठी ही निवडणूक… Continue reading संग्राम देशमुखांच्या विजयाने यशाची परंपरा कायम राखूया : खा. सुजय विखे-पाटील

नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचा फायदा :  मोदींची ‘मन की बात’

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) ‘मन की बात’ या कार्यक्रमातून नव्या कृषी कायद्यांवरुन आंदोलक शेतकऱ्यांचे मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला आहे. देशातील काही शेतकऱ्यांची उदाहरण देत नव्या कृषी कायद्यांचे महत्व मोदींनी यावेळी पटवून दिले. ‘दिल्लीच्या सीमेवर मागील काही दिवसांपासून पंजाब आणि हरियाणातील शेतकरी नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. तर विरोधकांनी… Continue reading नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचा फायदा :  मोदींची ‘मन की बात’

खंचनाळे यांच्या उपचारासाठी ५ लाखांचा मदतनिधी : आ. ऋतुराज पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गेल्या २८ दिवसांपासून वृद्धापकाळ व विविध आजारांनी ग्रस्त असलेले भारताचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्यावर योग्य प्रकारे चांगले उपचार व्हावेत, याकरिता राज्य शासनाच्या क्रीडा विभागाकडून त्यांना मदतनिधी मिळावा. यासाठी आमदार ऋतुराज पाटील यांनी क्रीडामंत्री सुनिल केदार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्यास यश आले असून पाच लाखांचा… Continue reading खंचनाळे यांच्या उपचारासाठी ५ लाखांचा मदतनिधी : आ. ऋतुराज पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

घरगुती कचरा इतरत्र टाकल्यास दंडात्मक कारवाई : डॉ. अशोक पोळ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दैनंदिन घरगुती कचरा इतरत्र टाकू नये, अथवा जाळू नये, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अशोक पोळ यांनी दिला आहे. शहरांतर्गत दैनंदिन निर्माण होणारा कचरा संकलनासाठी महापालिकेच्यावतीने ॲटो टिपर, घंटागाडीची सोय करण्यात आली असून, नागरिकांनी हा कचरा ओला, सुका आणि घरगुती घातक कचरा असे वर्गिकरण करुन ॲटो… Continue reading घरगुती कचरा इतरत्र टाकल्यास दंडात्मक कारवाई : डॉ. अशोक पोळ

error: Content is protected !!