शाळा कधी सुरू होणार याबाबत शिक्षणमंत्री म्हणाल्या…

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील कोरोनाचा प्रभाव कमी होत आहे. तरी राज्यातील शाळा दिवाळी नंतरच सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा लक्षात घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.  गायकवाड म्हणाल्या की, कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून टप्प्या-टप्प्याने शाळेतील वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. इयत्ता नववी ते बारावीचे विद्यार्थी… Continue reading शाळा कधी सुरू होणार याबाबत शिक्षणमंत्री म्हणाल्या…

‘त्या’मुळेच हजारो शेतकऱ्यांप्रमाणे मंडप व्यावसायिकांवर आत्महत्येची वेळ ! : सागर चव्हाण (व्हिडिओ)

‘त्या’मुळेच हजारो शेतकऱ्यांप्रमाणे आता मंडप व्यावसायिकांवरही आत्महत्येची वेळ आली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया ऑल महाराष्ट्र टेंट डीलर्स असोसिएशनचे चेअरमन सागर चव्हाण यांनी ‘लाईव्ह मराठी’कडे व्यक्त केली.  

कोरोना अपडेट : जिल्ह्यात दिवसभरात ६५ जणांना डिस्चार्ज, तर दोघांचा मृत्यू

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल (बुधवार) सायंकाळी पाचपासून आज (गुरुवार) सायंकाळी ५ पर्यंतच्या चोवीस तासात ५५ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात ६५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच ८५६ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज सायंकाळी ७ वा.प्राप्त झालेल्या अहवालानुसार कोल्हापूर शहरातील १६, चंदगड तालुक्यातील… Continue reading कोरोना अपडेट : जिल्ह्यात दिवसभरात ६५ जणांना डिस्चार्ज, तर दोघांचा मृत्यू

गांधीनगर मेनरोड येथील अतिक्रमणावर सार्वजनिक बांधकाम विभागाची कारवाई…

गांधीनगर (प्रतिनिधी) : तावडे हॉटेल ते चिंचवाड रेल्वे फाटक या गांधीनगर मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणांवर सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाई केली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा असणार्‍या दुकानांचे डिजिटल फलक, कठडे, अवैध बांधकामे आज (शुक्रवार) पाडण्यात आली. ही कारवाई सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता शिवाजी इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली केली गेली. तर ऐन सणासुदीच्या तोंडावरच अतिक्रमणावर कारवाई का केली जाते… Continue reading गांधीनगर मेनरोड येथील अतिक्रमणावर सार्वजनिक बांधकाम विभागाची कारवाई…

कंटेनरची मोटरसायकलला धडक : दोन गंभीर

टोप (प्रतिनिधी) : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर परपेक्ट पिन कंपनी समोर आज (शुक्रवार) दुपारच्या सुमारास एका अज्ञात कंटेनरने मोटरसायकला धडक दिल्याने मोटरसायकलवरील दोघे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर मोटरसायकलने पेट घेतल्यामुळे मोटरसायकलचे मोठे नुकसान झाले. घटनास्थळी शिरोली पोलिसांनी धाव घेवून मोटरसायकलची आग विझवली. मात्र, कंटेनर चालकाने गाडीसह पलायन केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे-बेंगलोरच्या दिशेने जाणाऱ्या मोटरसायकल क्रमांक… Continue reading कंटेनरची मोटरसायकलला धडक : दोन गंभीर

आता कोल्हापुरातील सर्व्हिसिंग सेंटर्सची होणार तपासणी…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहरामध्ये सर्व्हिसींग सेंटर मोठया प्रमाणात सुरु आहे. त्यांच्याकडे लायसन्स आहे का नाही याची तपासणी करा. ते सर्व्हिसिंग करताना पाण्याचा मोठया प्रमाणात वापर करतात. त्यांना कमर्शियल दराने आकारणी होते का याची तपासणी करा, अशा सुचना नगरसेविका माधूरी लाड यांनी आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत दिल्या. यावर सर्व्हिसींग सेंटरचा परवाना आणि त्याला होणारा पाणी… Continue reading आता कोल्हापुरातील सर्व्हिसिंग सेंटर्सची होणार तपासणी…

शहरातील अतिक्रमणाबाबत प्रशासनाची दिरंगाई का ? : शारंगधर देशमुख

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहरातील अतिक्रमणाबाबत वारंवार बैठकीत विषय होऊनही प्रशासनाकडून कारवाई होत नाही. अतिक्रमणाबाबत प्रशासनाची दिरंगाई होत असल्याने काँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख यांनी प्रशासनाला धारेवर धरले. ते आज (शुक्रवार) स्थायी समितीच्या बैठकीत बोलत होते. यावेळी देशमुख यांनी, हॉकी स्टेडियम, आरक्षित जागेमध्ये आणि मुख्य रस्त्याच्या बाजूला टपऱ्या, केबीन, टॅम्पो उभे करुन व्यवसाय सुरु आहे. तेथील शहरातील… Continue reading शहरातील अतिक्रमणाबाबत प्रशासनाची दिरंगाई का ? : शारंगधर देशमुख

मागण्या मान्य करा, अन्यथा… : मंडप असोसिएशन, ‘आम्ही रथवाला’चा इशारा (व्हिडिओ)

आमच्या व्यवसायावर अवलंबून असलेले अनेकजण शासनाच्या जाचक नियमामुळे त्रस्त आहेत. त्यामुळे आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा जिल्हा आणि शहर मंडप असोसिएशनचे पदाधिकारी आणि ‘आम्ही रथवाला’ कमिटीच्या तालुकाध्यक्षांनी दिला.  

महापालिकेची ब्लड बँक लवकर सुरु करावी : संदीप कवाळे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापनगरपालिका ब्लड बँकेचे काय झाले. प्रत्येक कामास वेळ का लागतो. तातडीने कामाची पुर्तता करुन ब्लड बँक सुरु करण्याची कार्यवाही अंतिम टप्यात आणावी, अशी मागणी माजी सभापती संदीप कवाळे यांनी आज स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाला दिल्या. यावेळी कन्सल्टंट नेमण्याबाबत तीन अर्ज आलेले आहेत. त्याची छाणणी प्रोसेस सुरु असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. आज (शुक्रवार)… Continue reading महापालिकेची ब्लड बँक लवकर सुरु करावी : संदीप कवाळे

शासनाला जाग आणण्यासाठीच आमचा हा लढा : साउंड, केटरिंग असोसिएशनचा इशारा (व्हिडिओ)

शासनाने निर्बंध लागू केल्याने आमचा व्यवसाय आणखी अडचणीत आला आहे. शासनाला जाग आणण्यासाठीच २ नोव्हेंबरला आंदोलन करणार असल्याचा इशारा जिल्ह्यातील साउंड, केटरिंग असोसिएशनने दिला आहे.  

error: Content is protected !!